शिर्डीत राष्ट्रवादीचे राज्यव्यापी शिबीर; शरद पवार नगरच्या शिलेदारांना काय सांगणार?

शिर्डीत राष्ट्रवादीचे राज्यव्यापी शिबीर; शरद पवार नगरच्या शिलेदारांना काय सांगणार?

Sharad Pawar : अजित पवार राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. निवडणुका जवळ आलेल्या असताना दोन्ही गटांकडून दबावाचे आणि कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यात आता दोन्ही गटांनी लक्ष केंद्रीत केले आहे. शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून डावलल्या गेलेल्या नेत्यांना अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून मानाचं पान दिलं जात आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटानेही नगर जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्यात पक्षाची घडी बसविण्याच्या उद्देशाने ऑक्टोबर महिन्यात शरद पवार (Sharad Pawar) गटाचे राज्यव्यापी शिबीर शिर्डीत आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिली. नगर शहरातील पक्ष कार्यालयातील बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ही पहिलीच बैठक होत आहे.

या शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. आता या बैठकीत शरद पवार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काय मंत्र देणार?, कुणावर प्रहार करणार?, नगर जिल्ह्यात पक्ष बांधणीच्या दृष्टीने काय नियोजन करणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

..तर ईडी, जिल्हा बँकेच्या चौकशीची यादीच बाहेर काढू; मुश्रीफांविरोधात शरद पवार गट आक्रमक

 

अजितदादांची ताकद नगरमध्ये वाढली

तसे पाहिले तर नगर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, अजित पवार यांच्या बंडानंतर जिल्ह्यातील पक्षाची ताकद घटली आहे. राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे दोनच आमदार शरद पवारांच्या साथीला आहेत. तर दुसरीकडे पारनेरचे आमदार निलेश लंके, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, अकोल्याचे आमदार किरण लहामटे आणि नगर शहराचे आमदार संग्राम जगताप अजित पवार गटात गेले आहेत. सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यात अजित पवार गटाची ताकद जास्त दिसत आहे. आता तर निवडणुका जवळ आल्या आहेत. महाविकास आघाडीत बरोबर असतानाही काँग्रेसने जिल्ह्यातील लोकसभेच्या मतदारासंघांवर दावा सांगितला आहे. यावर उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी काँग्रेसच्या या डावाने दोन्ही पक्षांना चिंतेत टाकले आहे.

Ahmednagar Politics : 2024 मध्ये कुणाचं सरकार? तनपुरेंनी स्पष्टच सांगितलं

काँग्रेसच्या या वरचढ राजकारणावर विचार करण्याचीही वेळ आली आहे. त्यादृष्टीने शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या बैठकीत काही चर्चा होणार का, हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube