Heavy rain in Ahilyanagar! Roads flooded; Cloudbursts in Sarola and Khadki : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर सुरू (Monsoon Update) असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत आहे. एकीकडे शेतकरी हवालदार झाला (Heavy Rain Alert) आहे, तर दुसऱ्या बाजूला मुंबईत आज सकाळपासून चाकरमान्यांचे हाल होतांना दिसत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं होतं. त्यानंतर आता राज्यात मान्सून देखील दाखल झालं आहे. यंदा तब्बल 10 दिवस अगोदर मान्सूनचं आगमन झालं आहे. यामध्ये अहिल्यानगरमध्ये दमदार पाऊस झाल्याने अनेक रस्ते जलमय झाले होते. तर सारोळा व खडकी या गावांमध्ये ढगफुटी झाल्याचं पाहायला मिळालं.
मिठीच्या घोटाळ्यावरून शिवसेनेचा ठाकरे पितापुत्रांवर निशाणा
गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यासह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासूनच शहर व परिसरामध्ये ढगाळ वातावरण झाले होते. दुपारपासून तर दुपारी अचानक पावसाला पुन्हा सुरुवात झाली आजचा पावसाची तीव्रता जास्त असल्याने काही काळ जनजीवन विस्कळीत जाण्याचे पाहायला मिळाले शहरातील अनेक भागांमध्ये गुडघाभर पाण्यातून नगरकरांना प्रवास करावा लागला. तर शहराच्या लगत असणाऱ्या उपनगरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस असल्याने घरासमोरील मोकळ्या जागेत जागेला छोट्या तळ्यांचे स्वरूप आले होते.
मॉन्सूनच्या पहिल्याच दिवशी आज 27 मे रोजी अहिल्यानगर तालुक्यातील सारोळा व खडकी गावात ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्यामुळे परिसर जलमय झाला होता. या पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.अहिल्यानगर शहरात मान्सूनचे दमदार आगमन मागील चार दिवसांपासून शहरात रिमझिम सुरू होती. मात्र, आज पावसाचे दमदार आगमन झाले. त्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. तर वाळकी परिसरातील नदीला महापूर आला. त्यामुळे अनेक जण या पुरात अडकले. त्यांना वाचविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.
शेतजमिनीचं काम अन् 5 लाखांची लाच; उपजिल्हाधिकारी ACB च्या जाळ्यात
तर गेल्या 48 तासांत अहिल्यानगर शहरासह जिल्हाभरात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. यामुळे श्रीगोंदा, कर्जत, नगर व पाथर्डी तालुक्यांना पावसाने झोडपले आहे. त्यामुळे पेरणीपुर्व मशागतीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे पेरणीवर विपरीत परिणाम होणार आहे. उन्हाळी कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे नगर शहरामध्ये पावसाने गटारी तुंबल्याने पाणी रस्त्यावर आले आहे. रस्त्यांचं बांधकाम आणि पावसामुळे वाहतूककोंडी होत आहे.
सारसनगर परिसरात स्लॅब कोसळून तरुणीचा मृत्यू
सारसनगर परिसरात स्लॅब कोसळून एक तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी (ता.27) रोजी दुपारी ही घटना घडली. या घटनेची माहिती कळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.तन्वी केदार रासने (वय 21) असे मृत तरुणीचे नाव आहे.नगर शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस सुरु होता. सारसनगर परिसरात दुपारच्या सुमारास एका बंगल्याचा समोरचा भाग अचानक कोसळल्याने त्याखाली एक 21 वर्षीय तरुणी जखमी झाली. या घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले. तिला तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.