Download App

हेरंब कुलकर्णी हल्ला प्रकरण; ठाकरे गट भेटीला

Ahmednagar News : सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आज शिवसेनेच्या ठाकरे गटाने त्यांची भेट घेतली. यावेळी भेट घेऊन कुलकर्णी यांच्या तब्येतीची चौकशीही केली आहे. दरम्यान, कुलकर्णी यांची भेट घेतल्यानंतर ठाकरे गटाकडून हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे.

तलाठी भरती परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी ‘या’ तारखेला होणार जाहीर, कधीपर्यंत मिळणार नियुक्तीपत्रे?

कुलकर्णी यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या पार्श्वभूमीवर आज ठाकरेंच्या शिवसेना गटाने कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. यावेळी नांदेड, घाटी घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून जिल्हा रुग्णालयाचा आढावा घेण्यात आला आहे.

Gunratna Sadavarte : महाराष्ट्राला पोलोचे खेळाडू, पाहुण्या कलाकारांची गरज नाही; सदावर्तेंची राज ठाकरेंविरोधात तक्रार

यावेळी पाहणीदरम्यान, ठाकरे गटाच्यावतीने आज जिल्हा रुग्णालयाची पाहणी करण्यात आली. यावेळी रुग्णालयात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. यावेळी शासनाने रुग्णालयाच्या कारभारात सुधारणा करावी, अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी दिला.

Assembly Elections : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले; 3 डिसेंबरला येणार निकाल

तसेच कदम म्हणाले, रुग्णालयात नर्सेस डॉक्टरांची कमतरता असून अनेक लोकं रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. त्यांना उपचार न मिळाल्यास ते आमच्याकडे संपर्क करीत असतात. त्यामुळे सरकारने तत्काळ लक्ष देऊन रुग्णालयात सोयीसुविधा देण्यात याव्यात अशी मागणी कदम यांनी केली आहे.

चेन्नईत भारतीय फिरकीपटूंचा जलवा, दीडशे धावांवर ऑस्ट्रेलियाच्या सात विकेट

प्रथम महापौर भगवान फुलसौंदर म्हणाले, मागील 15 दिवसांपासून राज्यात अनेक बालकांचा बळी गेला आहे, राज्य सरकारच या घटनेला जबाबदार असून सरकारचं लक्ष फक्त पक्ष फोडण्याकडे आहे, सरकारी रुग्णालय आज व्हेटिंलिटरवर आहे, त्यामुळे आज सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आढावा घेत असून रुग्णालयाच्या दुरावस्थेवरुन सरकारचा आणि आरोग्यमंत्र्यांचा धिक्कार असो, असंही ते म्हणाले आहेत.

Tags

follow us