Download App

नाशिकवर ‘विजय’ मिळवण्यासाठी ठाकरेंकडून ‘करंजकर’ फायनल? सुधाकर बडगुजर नवे जिल्हाध्यक्ष

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने नाशिकमध्ये (Nashik) मोठे फेरबदल केले आहेत. विजय करंजकर यांच्याजागी आता सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर करंजकर यांची लोकसभा संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे करंजकर यांची लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. (In Nashik, Sudhakar Badgujar has been appointed as Shiv Sena District President by the Thackeray Group, while Vijay Karanjkar has been appointed as Lok Sabha Organizer.)

नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचे बालेकिल्ला समजला जातो. 1996 मध्ये युतीत मतदारसंघ वाटून आल्यानंतर 1996, 1999, 2014 आणि 2019 असा चारवेळा शिवसेनेने भगवा फडकवला आहे. यात 2014 आणि 2019 असा सलग दोनवेळा हेमंत गोडसे यांनी विजय मिळविला आहे. मात्र गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जाणे पसंत केल्याने आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इथून नव्या चेहऱ्याचा शोध सुरु केला आहे. अशात करंजकर यांच्यारुपाने ठाकरे यांच्याकडे तगडा पर्याय असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या उमेदवारीची चर्चाही मागील काही दिवसांपासून सुरु आहे.

“मी स्वतः मतं मागते, नवऱ्याला फिरवत नाही” : सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना टोला, नणंद-भावजय वाद तापला

शिवसेनेचा नाशिक लोकसभा मतदारसंघात एकही आमदार नसला तरीही संघटनेची बांधणी पक्की आहे. शहरातील तिन्ही मतदारसंघांसोबतच सिन्नर, देवळाली आणि इगतपुरी इथे शिवसेनेची मोठी ताकद राहिली आहे. यापूर्वी या तिन्ही मतदारसंघांमधून शिवसेनेचे आमदार निवडून गेले आहेत. वर्षभरापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे अत्यंत विश्वासू भाऊसाहेब चौधरी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यापासून राऊत यांचे या मतदारसंघात दौरे वाढले आहेत. ड्रग्ज तस्कर ललित पाटीलचे नाशिक कनेक्शन आणि केंद्र सरकारने कांद्यावर लावलेली निर्यातबंदी या प्रश्नांवरुन ठाकरे गटाने इथून रान उठवले.

Tiger Shroff: वुमन्स प्रीमियर लीग 2024 मध्ये अभिनेत्याच्या ‘त्या’ कृतीने जिंकले चाहत्याचे मन

करंजकर यांची उमेदवारी अंतिम मानली जात असली तरीही दुसरा पर्याय म्हणून ठाकरे गट बाहेरुन उमेदवार आयात करण्याचीही योजना आखत असल्याचे सांगण्यात येत आहे. अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मानिकराव कोकाटे यांच्यासाठी ठाकरे गटाचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. कोकाटे हेही लोकसभेसाठी इच्छुक आहेत. 2019 मध्येही त्यांनी राष्ट्रवादीतून तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यांना तिकीट मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली. त्यावेळी त्यांचा पराभव झाला पण त्यांनी तब्बल एक लाख 34 हजार मते घेतली होती. कोकाटे यांच्याशी सध्या याबाबत चर्चा सुरु असल्याचीही माहिती ठाकरे गटाच्या गोटातून मिळत आहे.

follow us

वेब स्टोरीज