इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चोरट्यांनी साधला डाव, 6 तोळे सोने चोरले पण…

Indurikar Maharaj Daughter Wedding-लग्नसोहळ्यापूर्वी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात चोरट्यांनी हात साफ केलाय. यावेळी 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.

Indurikar Daughter Wedding

Indurikar Daughter Wedding

Indurikar Maharaj Daughter Wedding : निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj Daughter Wedding) यांच्या मुलीचा विवाह सोहळा रविवारी पार पडला. लग्नसोहळ्यापूर्वी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात चोरट्यांनी हात साफ केलाय. यावेळी 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. दोन महिलांच्या गळ्यातील हे दागिने चोरीला गेले असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. परंतु त्या महिला कोण होत्या, याची माहिती मात्र पोलिसांनी दिलेली नाही.

चोरी प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार सागर सुरेश कांबळे (रा. रमानगर वार्ड नं.01 श्रीरामपूर) व त्याच्या साथीदारासह केला आहे. तो त्याचे साथीदारासह चोरी केलेल्या सोन्याची वाटणी करण्यासाठी मोटार सायकलवर ममदापुर फाटा येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून सागर सुरेश कांबळे व बबलु उर्फ अब्दुल इब्राहिम पिंजारी या दोघांना ताब्यात घेतले होती. दोघे श्रीरामपूरमधील रहिवासी आहेत. आतिक आयुब उर्फ आरीफ शेख व सनी विलास या दोघांच्या साथीने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. या आरोपींकडून 11.5 ग्रमॅ वजनाचे सोन्याचे दागिने, दोन मोबाइल, मोटारसायकल असा मुद्दा जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यातील आरोपी हे संगमनेर शहर पोलिस स्टेशनला जमा केले आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस स्टेशनकडून तपास करण्यात येत आहे. इंदुरीकर महाराज यांच्या मुलीच्या लग्नासाठी राजकीय, सामाजिक, वारकरी अशी दिग्गज मंडळी आली होती. त्यात लग्न सोहळ्यात चोरट्यांनी डाव साधला आहे.

Exit mobile version