इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाचा जंगी सोहळा; फडणवीस, शिंदेंसह राज्यभरातील नेत्यांची हजेरी

Indurikar Maharaj-देवेंद्र फडणवीस म्हणाले, इंदुरीकर महाराजांनी समाजामध्ये लोकजागरणाच्या माध्यमातून एक सशक्त समाज तयार केलाय.

Devendra Fadanvis

Indurikar Maharaj Daughter Wedding : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्त महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा लग्नसोहळा (Indurikar Maharaj Daughter Wedding) संगमनेरमधील गुंजाळवाडीमध्ये शाही थाटात पार पडत आहे. या लग्नसोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितीत लावून वधु-वरांना आशीर्वाद दिले आहे.

इंदोरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा विवाह प्रसिद्ध उद्योजक सुनील विष्णू चिलप यांचा मुलगा साहिल यांच्याशी पार पडत आहे. गुंजाळवाडी या ठिकाणी आलिशान मंडप उभारण्यात आले होते. शाही जेवण ठेवण्यात आले होते. गगनगिरी महाराज सप्ताहाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रमही पार पडला. त्यानंतर किर्तनपुष्प आणि मग मुख्य विवाह सोहळा पार पडला आहे. या लग्न सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री व जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह राज्यातील आमदार, खासदार, युवा नेते झाडून उपस्थित होते.


इंदुरीकरांनी लोकजागरणाच्या माध्यमातून सशक्त समाज तयार केलाय-फडणवीस

देवेंद्र फडणवीस म्हणाले, इंदुरीकर महाराजांनी समाजामध्ये लोकजागरणाच्या माध्यमातून एक सशक्त समाज तयार केलाय. समाजाला एक दिशा देण्याचे काम केले आहे. तोच आनंद हा नव जोडप्याच्या जीवनात यावा, असे म्हणत वधू-वरांना शुभेच्छा दिल्या आहेत.


स्वागतासाठी तांबे आणि खताळ यांच्यामध्ये चढाओढ

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इंदुरीकर महाराज यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यासाठी संगमनेरमध्ये हेलिपॅडने दाखल झाले आहेत. अपक्ष आमदार सत्यजित तांबे आणि शिंदेसेनेचे आमदार अमोल खताळ दोघेही उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. स्वागतासाठी तांबे आणि खताळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ दिसून आली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखल्यानंतर अमोल खताळ हे पोलिस अधिकाऱ्यांवर संतप्त झाले होते.

follow us