शंभर एकरावर मंडप, मंत्री, राजकीय मंडळींना निमंत्रण; इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा शाही लग्नसोहळा

Indurikar Maharaj -या लग्नसोहळ्याची जोरदार तयारी गुंजाळवाडीत सुरू आहे. या सोहळ्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून जय्यत तयारी सुरू आहे.

Indurkar Maharaj Daughter Wedding

Indurikar Maharaj : शंभर एकरावर आलिशान मंडप… राज्यातील खासदार, आमदार, मंत्री, उद्योजकांना निमंत्रण, कीर्तनकारांची मांदियाळी, जेवणाची रेलचेल शाही लग्नसोहळा उद्या रविवारी संगमनेरमधील गुंजाळवाडीत होत आहे. आता शाही लग्नसोहळा एखादी राजकीय व्यक्तीच्या घरातील किंवा उद्योजकाच्या घरातील असेल असं तुम्हाला वाटलं असेल. पण हा लग्नसोहळा आहे आपल्या कीर्तनातून खळखळून हसविणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्त महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर (Indurikar Maharaj) महाराज यांच्या मुलीचा.

इंदोरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा विवाह प्रसिद्ध उद्योजक सुनील विष्णू चिलप यांचा मुलगा साहिल याच्याशी होत आहे. हा विवाह सोहळा उद्या रविवारी सायंकाळी 6.50 वाजता होणार आहे. या लग्नसोहळ्याची जोरदार तयारी गुंजाळवाडीत सुरू आहे. या सोहळ्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून जय्यत तयारी सुरू आहे. तब्बल शंभर एकर परिसरात भव्य तयारी करण्यात आली आहे. या ठिकाणी आलिशान मंडप उभारण्यात आलेला आहे. गगनगिरी महाराज सप्ताहाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रमही पार पडणार आहे. त्यानंतर किर्तनपुष्प आणि मग मुख्य विवाह सोहळा पार पडणार आहे इंदोरीकर महाराजांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह आजी-माजी मंत्री, आजी-माजी आमदार, खासदार तसेच राज्यभरातील अनेक दिग्गजांना विवाह सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच राज्यातील कीर्तनकारही सोहळ्याला असणार आहेत.

साखरपुडाही शाही, लग्नही शाही
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्त महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर हे कीर्तनातून साधेपणाचा सल्ला देत होते. लग्न साधे करा, खर्च कमी करा, असे अनेक कीर्तनातून इंदोरीकर महाराज सांगत होते. परंतु काही महिन्यांपूर्वी इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा शाही थाटात पार पडला होता. त्यावर त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आले होते. त्यानंतर निवृत्ती महाराज यांनी ट्रोलर्सला चांगलेच फटकारले होते. लग्न आणखी जोरात करणार, काय बोंबलायचंय बोंबला’, असं म्हणत इंदोरीकर महाराजांनी टीका करणाऱ्यांना उत्तर दिले होते. आता ते मुलीचे लग्न शाही पद्धतीने करत आहेत.

follow us