मुलीच्या लग्न सोहळ्याचा खर्च कोणी केला ? इंदुरीकर महाराजांनी जाहीरपणे नावे सांगत ट्रोलर्सला सुनावले !

Indurikar Maharaj- तिसरा वर्ग असा म्हणेल माझ्यावर प्रेम करणाऱ्या भक्त मंडळींनी लग्नाचा खर्च नव्वद टक्के केला आहे. हे खरं आहे.

Indurikar Wedding

Indurikar Wedding

Indurikar Maharaj Daughter Wedding : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्त महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा लग्नसोहळा (Indurikar Maharaj Daughter Wedding) संगमनेरमधील गुंजाळवाडीमध्ये शाही थाटात पार पडला आहे. या विवाह सोहळ्याच्या खर्चावरून निवृत्ती महाराज देशमुख यांना ट्रोल केले जात आहे. लग्नसोहळ्यात इंदुरीकर महाराज यांनी ट्रोल करणाऱ्यांना जोरदार सुनावले. तसेच लग्नसोहळ्याचा खर्च कोणी केला हेही इंदुरीकर महाराज यांनी जाहीर केले आहे.

इंदुरीकर महाराज म्हणाले, आम्ही कोणत्याच क्षेत्रात कमी पडलो नाही. मंदिर बांधायलाही पुढेच होतो. सप्ताह करायला पुढे असतो. विद्यालय चालवायला मी पुढेच आहे. आतापर्यंत एक रुपया न घेता मी पंधरा शिक्षक नेमले आहेत. आतापर्यंत विद्यालयात फी नाही. आता ट्रोल करताना त्याचे उत्तर शोधले पाहिजे.


Video : ऑलिम्पिक कुस्तीपटू विनेश फोगटचा माजी खासदार भृजभूषण सिंहवर गंभीर आरोप; कुस्ती जगतात खळबळ

उद्या प्रश्न करतील एेवढा खर्च मी कसा केला आहे. हे पैसे आणले कुठून ? एक वर्ग असा म्हणेल, जनतेचे गोळा केला आणि जनतेला दिले. दुसरा वर्ग असा म्हणेल, त्यांनी जनता लुटली, तिसरा वर्ग असा म्हणेल माझ्यावर प्रेम करणाऱ्या भक्त मंडळींनी लग्नाचा खर्च नव्वद टक्के केला आहे. हे खरं आहे. देशमाने, कातोरी यांनी खर्च केलाय.


मला डॉक्टर व्हायचं होत पण…, राजकारणात स्थिरावलेल्या पंकजा मंडे असं का म्हणाल्या?


कुत्र्याचे शेपूट वाकडं ते वाकडंच -इंदुरीकर

तुम्ही बॅण्डवाल्यांना विचारा, मंडपावाल्यांना विचारा, आचारी यांना विचारा. आतापर्यंत 26 वर्षांत माझ्याबरोबर एकानेही व्यवहार केलेला नाही. त्यामुळे ट्रोल करणाऱ्यांना विचारायचा अधिकार नाही. मला देणाऱ्यांनी दिले आहे. त्यावर चर्चा व्हायचे कारण नाही. ट्रोल करणाऱ्यांच्या बौद्धिकपातळीचा प्रश्न आहे. तुम्ही किती सांगितले तरी, दीड लाखांची सोन्याची नळी घेऊन आलं तरी कुत्र्याच शेपूट सरळ होत नाही.


तशी समाजामध्ये नासकी प्रवृत्तीची लोकं

त्यासाठी एक शब्द सांगतो. चांगदेव 65 मध्ये लिहिलेले आहे. एक हटहोगी आहे, एक ज्ञानयोगी आहे. चांगदेव महाराज हटयोगी आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानयोगी आहेत. हटयोगीकडून ज्ञानयोगीकडे आलेले पत्र कोरे आहे. ज्ञानयोगीकडून हटयोगीकडे पत्र जाते, त्यात 65 ओव्या आहेत. तीन ओव्या असा आहेत, त्यात ज्ञानेश्वरांनी सुंदर तीन शब्द वापरले आहे. अलंकार तुम्ही कोणताही करा, त्याला कोणताही आकार द्या. पण सोनाचं सोनंपण सोडत नाही. कपडे तुम्ही कोणतेही घ्या, कापड सूत सोडत नाही आणि गुळ तुम्ही कापा, फोडा, पाण्यात शिजवा. गुळ गोडी सोडत नाही. तशी समाजामध्ये नासकी प्रवृत्तीची लोकं, तुम्हाला त्यांना काहीही करा ते त्यांचा मूळ स्वभाव सोडत नाही. अशी माणसे जरूर पाहिजे. त्यांच्यामुळे चुका कळतात, असे ते म्हणाले.

Exit mobile version