मला डॉक्टर व्हायचं होत पण…, राजकारणात स्थिरावलेल्या पंकजा मंडे असं का म्हणाल्या?
परळी येथे आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आमदार धनंजय मुंडे यांचीही उपस्थिती होती.
मला डॉक्टरव्हायचं होतं, परंतु मार्क कमी मिळाले (Beed) म्हणून मी ऍडमिशन घेतलं नाही. आमच्या प्रीतम ताईंना वकील व्हायचं होतं, परंतु त्या डॉक्टर झाल्या. आणि येसू ताई वकील झाल्या. धनु भाऊ मात्र भाग्यवान आहेत, त्यांना राजकारणी व्हायचं होतं आणि ते राजकारणातच आले. असंच होतं ज्याला जे व्हायचं असतं ते होता येत नाही. असं म्हणत मंत्री पंकजा मुंडे यांनी डॉक्टर होण्याच्या आपल्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाबद्दल जाहीर कार्यक्रमात मत व्यक्त केलं.
परळी येथे आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आमदार धनंजय मुंडे यांचीही उपस्थिती होती. दरम्यान, याचवेळी पंकजा मुंडे यांनी माझा आणि माझ्या व्यवसायाचा दूर दूर पर्यंत संबंध नाही. मी मोठी डिस्टिलरी चालवते. परंतु त्याबाबत मला कुठलीही माहिती नसते. तिथला ब्रँड देखील मला माहित नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हणतात उपस्थित यामध्ये एकच हशा पिकला. दरम्यान, याच कार्यक्रमात बोलताना आमदार धनंजय मुंडे यांनीही मिश्किल फटकेबाजी केली. आपल्या भाषणासाठी ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या भाषणाचा अंदाज पुन्हा पाहायला मिळाला.
ती तुझी नाही माझी झाली; बीडच्या केज तालुक्यात एकजणाला मारहाण
कार्यक्रमातील अधिकाऱ्यांना तुम्ही पहिल्यांदा मराठवाड्यात आलात, उभे राहायचं सोडा इथं बसायची कशी अडचण होती हे तुम्ही सांगितलं आम्ही. मराठवाड्यातले दगडातले माणसं आहोत, दगडावरही बसतो. तुम्ही आमच्या प्रेमात पडाल, आमचा पाहुणचार एवढा असतो तुमच्यासारखं नाही पाणी घ्यायचं का इथं पाजतेच, असं म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला आणि अधिकाऱ्यांनी उठून दोन्ही हात जोडत नमस्कार केलाय. बारावी परीक्षेचा निकाल काल बोर्डाने घोषित केला. परीक्षेत नापास झाल्याने एका विद्यार्थ्यानं टोकाची भूमिका घेत शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा गावात घडली.
नामदेव खंडाते असं या विद्यार्थ्याचं नावं आहे. नामदेव हा नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील देवलापार येथील एका महाविद्यालयात बारावीचा शिक्षण घेत होता. काल लागलेल्या निकालात तो नापास झाल्याची माहिती मिळताच याचा धक्का त्याला बसला आणि स्वगावी असताना शेतात जाऊन त्याने गळफास घेतली ही घटना रात्री उशिरा कुटुंबियांच्या लक्षात आली. याप्रकरणी आता गोबरवाही पोलिसांनी मर्ग दाखल केला असून अधिक तपास करीत आहे.