Download App

Ahilyanagar : जादा परताव्याचे आमिष दाखवून 400 कोटींची फसवणूक, संचालक पसार, आता शासकीय कर्मचारीही रडारवर

श्रीगोंदा तालुक्यात इन्फिनिटी बिकॉनचा 400 कोटींच्या फसवसणुकीचा घोटाळा समोर आला होता. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला.

  • Written By: Last Updated:

Infinity Bicon :  श्रीगोंदा तालुक्यात इन्फिनिटी बिकॉनचा (Infinity Bicon) 400 कोटींहून अधिक रकमेच्या फसवसणुकीचा घोटाळा समोर आला. त्यानंतर इन्फिनिटी बिकॉनच्या संचालकांविरोधात श्रीगोंदा पोलिस (Shrigonda Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आता या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलाय. आर्थिक गुन्हे शाखेने तपासासाठीची कागदपत्रे शनिवारी (26 जुलै) ताब्यात घेतली आहेत.

आमिर खानच्या घरी पोहोचले IPS अधिकारी, खरे कारण आले समोर 

काय आहे इन्फिनिटी बिकॉन घोटाळा?
शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून दरमहा 5 ते 10 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. श्रीगोंदा तालुक्यात सिस्पे, इन्फिनाईट बिकॉन फायनान्शिअल सर्विसेस, आयएफ ग्लोबल ट्रेडिंग, सर्व्हिस एज्युटेक, एलएलपीएस अशा वेगवेगळ्या नावांनी ही कंपनी लोकांकडून पैसे गोळा करत होती. वाढीव व्याजाच्या हव्यासापायी अनेकांनी पतसंस्था, बँकांत ठेवलेले आपल्या ठेवी काढून या कंपनीत गुंतवल्या. सुरूवातीला लोकांना गुंतवणूकीवर परतावा मिळत होता. पण, नंतर परतावा मिळणेच बंद झाले.

शासकीय कर्मचारी अन् अधिकारी रडारवर…
शासकीय कार्यालयातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी या कंपनीचे एजंट असल्याचे समोर आले आहे. पोलिस, महसूल, जिल्हा परिषद आणि इतर अनेक शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी कंपनीसाठी एजंट म्हणून काम करत होते. पोलिस खात्यातील 350 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी या कंपनीत गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. आता शासकीय कर्मचाऱ्यांची नावे चौकशीतून समोर येणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

Video : बायकोच्या गाडीत बंदूक ठेवली त्या माणसासोबत काम करण कसं योग्य असू शकतो?, सुप्रिया सुळेंचं मोठं विधान 

जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांची या कंपनीत गुंतवणूक असून काहींनी एजन्सी घेत कंपनीचा फायदा करून दिला.

पोलिस खात्यातील कर्मचारी चिंतेत
या कंपनीत पोलिस खात्यातील काही अधिकाऱ्यांनी लाखो रूपयांची गुंतवणूक केल्याचे सांगितले जाते आहे. अनेक कर्मचारी कंपनीचे एजंट आहेत. कंपनीचे दिवाळे निघाल्याने गुंतवणूकदारांचे पैसे परत करायचे कसे, हा प्रश्न आता या एजंटांसमोर आहे. तर दुसरीकडे पोलिस खात्यातील आपल्याच अधिकाऱ्यांकडून चौकशीला सामोरे जावे लागणार आणि त्यामुळे बदनामीही होणार, यामुळं कंपनीशी संबंधित कर्मचारी चितेंत आहे.

अहिल्यानगरमधून मोठी गुंतवणूक
या कंपनीत अहिल्यानगर शहरासह भिंगार, नागापूर, बोल्हेगावातील अनेकांनी गुंतवणूक केली आहे. संचालक परदेशात पसार झाले आहेत. त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीच्या अनेक तक्रारी रोज पोलिसांकडे येत आहेत.आता तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला असल्याने आणखी काही फसवणूकीची प्रकरणे आता समोर येण्याची शक्यता आहे.

follow us