Video : बायकोच्या गाडीत बंदूक ठेवली त्या माणसासोबत काम करण कसं योग्य असू शकतो?, सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

Video : बायकोच्या गाडीत बंदूक ठेवली त्या माणसासोबत काम करण कसं योग्य असू शकतो?, सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

MP Supriya Sule Exclusive : ज्या व्यक्तीने आपल्या बायकोच्या गाडीत बंदूक ठेवली त्या माणसासोबत काम करण कसं योग्य असू शकतो? ज्याच्यावर महिलेच्या छळाची केस आहे, अशा व्यक्तीला पुन्हा मंत्रिपदावर घेण हा फार दुर्दैवी निर्णय असेल. (Sule) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घाईघाईने असा निर्णय घेणं चूक असेल असं थेट शब्दांत आपलं मत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बारामती खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे. खासदारांचे रिपोर्ट कार्ड या कार्यक्रमात त्या लेट्सअप मराठीवर बोलत होत्या. संपादक योगेश कुटे यांनी अनेक विषयांवर सुळे यांना बोलत केलं आहे.

पक्ष जर एकत्र असता तर इतका वेळ कधीच लागला नसता, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी. ज्या परिस्थितीमध्ये त्यांनी राजीनामा दिला त्यामध्ये संतोष देशमुख यांची हत्या हे प्रकरणही होत. परीक्षा तोंडावर असताना संतोष देशमुख यांची मुलगी न्याय मागण्यासाठी वणवण फीरत होती असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी त्या कुटुंबाच दु:ख मांडलं आहे. तसंच, तुमचं त्यांच्यावर प्रेम असेलच तर दुसरी कोणतीही जबाबदारी द्या. पण, मंत्रिपद देऊन तुम्ही राज्याला काय सांगणार आहात? असंही त्या म्हणाल्या आहेत.

कोकाटेंना आम्ही मंत्रिपद दिलं नव्हतं, पण देवेंद्रजी सुसंस्कृत; कोकाटेंच्या राजीनाम्याहून सुप्रिया सुळेंचा टोला

त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यावर आमच्यापेक्षा कागदपत्रांच्या आधारे भाजपने त्यांच्यावर जास्त हल्ला केला आहे. त्यावेळी मी जाऊन देशमुख यांच्या कुटुंबाला जाऊन भेटली. त्यांनी काय भोगलंय, त्यांच्या काय वेदना आहेत हे पाहिलं पाहिजे. हे सगळ असं असताना पु्ण्याचे पालकमंत्री हे सगळ विसरणार नाहीत असं मला वाटलं होतं असा नाव न घेता अजित पवारांना सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला आहे.

तुम्ही संतोष देशमुख यांची पत्नी, आई मुलगी यांच्यासह महादेव मुंडे यांच्या पत्नी मुलांना तुम्ही काय उत्तर देणार आहात? तुमच्या मंत्र्याच्या अशिर्वादाने आकाने तुमच्या पतीचा खून केला असं सांगणार आहात का? असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसंच, या सगळ्या गोष्टींचा डेटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहित होता म्हणूनच त्यांनी राजीनामा घेतला ना? ते माहित नसतं तर घेतला असता का राजीनामा असा थेट प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, सध्या फक्त चर्चा असून मुंडे यांना मंत्रिपद देण्याचा निर्णय झालाच तर त्याचे राजकीय काय परिणाम होतील हे पाहण महत्वाचं असणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube