कोकाटेंना आम्ही मंत्रिपद दिलं नव्हतं, पण देवेंद्रजी सुसंस्कृत…; कोकाटेंच्या राजीनाम्याहून सुप्रिया सुळेंचा टोला

Supriya Sule या लेट्सअपच्या खासदारांचे रिपोर्ट कार्ड या मुलाखत कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी कोकाटेंवर जोरदार टीका केली.

Letsupp Marathi (21)

Supriya Sule on Manikrao Kokate rummy video and resignation : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर राजीनाम्याची टांगती तलवार आहे. कारण विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधानसभेत ऑनलाईन रमी गेम खेळत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. आमदार रोहित पवार यांनी 20 जुलै रोजी पोस्ट केला होता. त्यावरून कोकाटे यांच्यावर सर्वच स्तरातून जोरदार टीका करण्यात आली. त्यांच्या राजीनाम्याची मागणीही सर्वच स्तरांतून होत आहे. त्यात आता शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नैतिकतेला धरून महाराष्ट्राच्या सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा घ्यावा अशी जोरदार मागणी केली आहे.

भारतीय सैन्याचं ‘ऑपरेशन महादेव’ यशस्वी; पहलगाम हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांचा श्रीनगरमध्ये खात्मा?

खासदार सुप्रिया सुळे या लेट्सअपच्या खासदारांचे रिपोर्ट कार्ड या मुलाखत कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी बोलताना सुप्रिया सुळेंनी कोकांटेवर रमी खेळत असल्याच्या व्हिडीओवरून आणि शेतकऱ्यांना, सरकारला भिकारी बोलल्याच्या वादावरून जोरदार टीका केली. आहे. मुख्यमंत्र्यांनी इतरही काही मंत्र्यांचे नैतिकतेला धरून राजीनामे घ्यावेत अशी मागणी केली आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

राज्याच्या कृषीमंत्र्यांनी राजीनामा द्यावा का? असं विचारल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “एखादा मंत्री विधानभवनात रमी खेळतो ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे. तुमचा सहकारी काम करताना जर रमी खेळत असेल तर तुम्हाला चालेल का? जुगार खेळले तेही कुठे तर ज्याला आम्ही मंदिर म्हणतो. अशा विधानभवनात. जे जे लोकप्रतिनीधी तिथे जातात. ते सर्व भाग्यवान आहेत की, त्यांना त्या वास्तुमध्ये जाता आलं. संसद, विधानभवन हे माझ्यासाठी मंदिर आहे. अशा ठिकाणी जुगार खेळणं हा त्या वास्तुचा अपमान आहे”. अशा तीव्र शब्दांत सुप्रिया सुळेंनी कृषीमंत्री कोकाटेंचा समाचार घेतला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुसंस्कृत

पुढे बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “हा नैतिकतेचा विषय आहे. नैतिकतेला धरून कोकाटेंनी आतापर्यंत स्वतःहून राजीनामा द्यायला हवा होता. आधी तुम्ही शेतकऱ्यांना भिकारी म्हणता, मग तुम्ही ज्या सरकारमध्ये आहात त्याला भिकारी म्हणता, ही पैसा आणि सत्ता यांची गुर्मी नाहीतर काय आहे”, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. आणखी कोणकोणते मंत्री आहेत ज्यांनी राजीनामा द्यावा असं तुम्हाला वाटतं, या प्रश्नावर त्या म्हणाला की, “मी देवेंद्रजींना सुसंस्कृत समजते. माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यांना आवरावं आणि जे कोणी सात-आठ जण आहेत त्यांचा नैतिकतेवर राजीनामा घ्यावा. नैतिकता आणि या सरकारचा थोडा जरी संबंध असेल तर त्यांनी तातडीने राज्याच्या हितासाठी हे राजीनामे घ्यावेत”.

गुटखा विक्रीच्या हप्त्याचे कनेक्शन पाचपुते कुटुंबाशी! राहुल जगतापांचा आमदार पाचपुतेंवर निशाणा

ज्यावेळी कोकाटे तुमच्या पक्षात होते तेव्हाही ते असचं बोलायचे तेव्हा तुम्ही त्यांना समज देत होतात का, या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “ज्यावेळी कोकाटे आमच्या पक्षात होते तेव्हा पवार साहेबांनी त्यांना कधी मंत्रीपद दिलं नाही हे एक आणि ते ज्यावेळी आमच्यासोबत होते तेव्हा आमचा पक्ष कधी अडचणीत आला नव्हता.

follow us