Jalgaon District Bank Election : महायुतीचा फॉर्म्युला तयार; भाजप मोठा भाऊ, शिवसेना-राष्ट्रवादीला किती जागा मिळणार?

Jalgaon District Bank Election: जळगाव जिल्हा बँक निवडणुकीसाठी महायुतीचा 9-7-5 जागावाटप फॉर्म्युला चर्चेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मुक्ताईनगर, भडगाव, रावेर व चोपडा जागांवरून पेच कायम.

Jalgaon District Co Operative Bank

Jalgaon District Co Operative Bank

Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या (Jalgaon District Bank Election) निवडणुकीसाठी महायुतीने जागावाटपाचे गणित जवळपास निश्चित झालेले आहे. परंतु काही जागांववरून मात्र तिढा निर्माण झाला आहे. मुक्ताईनगर, भडगाव, रावेर आणि चोपडा यांसह महत्त्वाच्या संस्थांच्या जागांवर अद्याप तिन्ही पक्षांमध्ये एकमत झालेले नाही. त्यामुळे जागावाटपावरून महायुतीमध्ये राजकीय रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे.

महायुतीच्या बैठकीत प्रमुख नेत्यांची उपस्थिती
जळगाव जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसंदर्भात एमआयडीसी परिसरातील बालाणी लॉन येथे महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या रणनीतीसह जागावाटपावर सविस्तर चर्चा करण्यात आली. भाजपकडून मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे आणि जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी उपस्थित होते. शिवसेनेकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार अमोल पाटील, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत सोनवणे आणि जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे उपस्थित होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार अनिल पाटील, मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील आणि बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी बैठकीत चर्चा केली.


तरुणांसाठी सरकारचा नवा प्लॅन! आता फक्त 5 कारवर सुरू करता येणार कॅब बिझिनेस

जागांच्या संख्येवर सहमती; दावेदारीवरून पेच
या बैठकीत जागा वाटपाचे समीकरण मांडण्यात आले आहेत. जागा वाटपाबाबत एकमत झाल्याचे बोलले जात आहे. भाजपला सर्वाधिक 9, शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 5 जागा देण्याच्या 9-7-5 फॉर्म्युल्यावर प्राथमिक सहमती झाल्याची चर्चा आहे. या फॉर्म्युल्याला अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही. मुक्ताईनगर आणि भडगावसह रावेर, चोपडा तसेच काही संस्थांच्या जागांवर एकापेक्षा अधिक पक्षांनी दावा केल्याने जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. या ठिकाणी स्थानिक राजकारण वेगळे आहे. त्यामुळे या ठिकाणी महायुतीमध्ये लढती होऊ शकतात.


राज्यात हुडहुडी वाढणार! पुणे, नाशिक, जळगावसह अनेक शहरांचे तापमान घसरले, पुढील 3 दिवस महत्त्वाचे

17 तारखेला अंतिम जागावाटप स्पष्ट होणार?
जिल्हा बँकेची निवडणूक महायुतीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. महायुती म्हणून निवडणूक लढवण्यावर सहमती असली, तरी जागांचे अंतिम वाटप 17 नोव्हेंबर रोजी उमेदवारी मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या अंतिम जागावाटपाकडे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version