Jayant Patil : पवारांचे निकटवर्तीय जयंत पाटील ( Jayant Patil ) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यादरम्यान जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना पुर्ण विराम दिला. तसेच त्यांनी महाविकास आघाडीच्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपाबाबत माहिती देताना एकनाथ खडसेंनी (Eknath Khadase) लोकसभेतून माघार घेतल्याचं सांगितलं.
Jayant Patil : आंबेडकरांना विश्वासात घेऊनच निर्णय; जागा वाटपावर जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
यावेळी जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट त्यांची लोकसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाली. आहे. तसेच प्रकाश आंबेडकरांसोबतही बैठका झाल्या आहेत. पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तीनही पक्षांमध्ये समन्वय झाला आहे. त्यामुळे येथे सात आठ दिवसांमध्ये आम्ही निष्कर्षापर्यंत येऊ. पण प्रकाश आंबेडकर यांना विश्वासात घेऊन हा निर्णय होईल.
NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार नाव कायम पण चिन्ह कधी मिळणार? SC चा निर्णय
तर रावेर लोकसभा या जागेसाठी तीनही पक्षांची साधक-बाधक चर्चा झाली. त्यामध्ये एकनाथ खडसे यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांनी निवडणूक लढवण्यास असमर्थता व्यक्त केली असल्याने तिथे पर्याय उमेदवार शोधण्याचे काम सुरू आहे. तसेच लोकसभेच्या सर्व जागांवर महाविकास आघाडीची चर्चा झाली असून लवकरच यावर मत व्यक्त होणार आहे. पण अंतिम निर्णय हा प्रकाश आंबेडकर यांना विश्वासात घेऊन घेतला जाईल. असे यावेळी जयंत पाटील यांनी सांगितला.
भारतीय वंशाचा तरुण अमेरिकेच्या राजकारणात; कोण आहेत अश्विन रामास्वामी?
दरम्यान एकनाथ खडसे हे देखील पुन्हा भाजपमध्ये येणार असल्याचा गौप्यस्फोट नुकताच राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केला होता. ते म्हणाले होते की, गिरीश महाजन यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खडसे यांच्या घरवापसीच्या चर्चांवर स्पष्ट उत्तर दिले. एकनाथ खडसे भाजपात परतण्यासाठी फार जोर लावत आहेत अशी माहिती मला कळाली आहे.
पण पक्षाच्या नेत्यांकडून मला याबाबत अजून तरी विचारणा झालेली नाही. मला वाटतं तसं काही प्रयोजन नाही. मला अजून तरी एकनाथ खडसे यांना पुन्हा भाजपात घ्यायचे की नाही याबाबत कुणीही विचारलेले नाही. मी एक लहान कार्यकर्ता आहे. एकनाथ खडसे यांची कदाचित थेट वरून हॉटलाइन असेल तर त्यांनी लावावी, असे महाजन म्हणाले.