भारतीय वंशाचा तरुण अमेरिकेच्या राजकारणात; कोण आहेत अश्विन रामास्वामी?
Ashwin Ramaswami : अश्विन रामास्वामी हे अमेरिकेतील राज्य सभागृहासाठी अर्थात विधानसभेची निवडणूक लढवणारे पहिले जनरल झेड भारतीय ठरले आहेत. अश्विन रामास्वामी (Ashwin Ramaswami) हे मूळचे भारतीय असून काही वर्षांपूर्वीच त्यांचं कुटुंबिय अमेरिकेत स्थायिक झालं. अश्विन रामास्वामी हे एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असून ते जनरल झेड म्हणून ओळखले जातात. भारतीय वंशाच्या व्यक्तीने अमेरिकेत विधानसभा निवडणूक लढवणं ही अभिमानास्पद बाब असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे कोण आहेत अश्विन रामास्वामी अशाही चर्चा होत आहेत.
सरकारने अंत पाहू नये, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार ; जरांगे आक्रमक
कोण आहेत अश्विन रामास्वामी?
अश्विन रामास्वामींचे आई-वडील 1990 मध्ये तामिळनाडूतून अमेरिकेत स्थायिक झाले. त्यांना जनरेशन Z झूमर्स म्हणूनही ओळखले जाते. जनरल झेड म्हणजे 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेल्या लोकांचा समावेश होतो. भारतीय अमेरिकन सॉफ्टवेअर अभियंता अश्विन रामास्वामी हे अमेरिकेत विधानसभेसाठी निवडणूक लढवणारे पहिले जनरल झेड भारतीय बनले आहेत.
रामास्वामी हे दुसऱ्या पिढीतील भारतीय-अमेरिकन आहेत आणि त्यांनी सॉफ्टवेअर अभियांत्रिकी, निवडणूक सुरक्षा आणि तंत्रज्ञान कायदा आणि धोरण संशोधनात करिअर केले आहे. ते डेमोक्रॅटिक पक्षाकडून जॉर्जिया जिल्हा 48 मधील स्टेट सिनेटसाठी निवडणूक लढवत आहेत. रामास्वामी हे डेमोक्रॅटिक आहेत. अश्विन रामास्वामी यांची आई चेन्नईची आहे, माझे वडील कोईम्बतूरचे आहेत. मी हिंदू आहे. मला आयुष्यभर भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानात खूप रस आहे. अश्विन रामास्वामी यांनी चिन्मय मिशन किंडरगार्टनमधील रामायण, महाभारत आणि भगवद्गीता यांसारख्या महाकाव्यांचे वाचन केले आहे.
अजितदादांनी फोडला सुनील तटकरेंच्या प्रचाराचा नारळ, रायगडची जागा राष्ट्रवादीचीच…
रामास्वामी निवडणूक जिंकल्यास, ते जॉर्जियातील पहिले जनरेशन झेड राज्य सिनेटर आणि संगणक विज्ञान आणि कायदा या दोन्ही पदव्या घेणारे येथील पहिले सिनेटर असतील. प्रत्येक व्यक्तीला दर्जेदार शिक्षण मिळेल याची काळजी घेतली पाहिजे. लोकांना नोकऱ्या आणि अर्थव्यवस्था, उद्योजकता तसेच आरोग्यसेवा, पुनरुत्पादक हक्क आणि आमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या सर्व समस्यांपर्यंत पोहोचता येईल याची आम्हाला खात्री करायची आहे. त्यामुळेच मी निवडणूक लढवत असल्याचं अश्विन रामास्वामी यांनी स्पष्ट केलं आहे.