अजितदादांनी फोडला सुनील तटकरेंच्या प्रचाराचा नारळ, रायगडची जागा राष्ट्रवादीचीच…

अजितदादांनी फोडला सुनील तटकरेंच्या प्रचाराचा नारळ, रायगडची जागा राष्ट्रवादीचीच…

Ajit Pawar : रायगड लोकसभेच्या (Raigad Lok Sabha) जागेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून या जागेवर दावा केला जात आहे. मात्र वाद संपुष्टात येण्याची शक्यता आहे. रायगडची जागा राष्ट्रवादीला मिळेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी स्पष्ट केले.

म्हसळा येथे झालेल्या सभेत अजित पवार यांनी रायगड लोकसभा मतदारसंघ सुनील तटकरे यांचा असल्याचे सांगितले. तसेच कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी अजित पवार यांनी एकप्रकारे सुनील तटकरे यांच्या प्रचाराचा नारळ फोडला.

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागावाटप झाले नसून, रायगडच्या जागेवरून महायुतीमध्ये खडाजंगी सुरू आहे. शनिवारी अजित पवार यांनी ही जागा आपली असल्याचे सांगत प्रचाराला सुरुवात केली.

CM शिदेंच्या भाषणाकडे कोल्हापूरकरांनी फिरवली पाठ, रिकाम्या खुर्च्या पाहून मुख्यमंत्र्यांचा हिरमोड
सुनील तटकरे रायगड लोकसभेसाठी तयार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगड लोकसभेचा वाद संपवला. भाजपकडून उमेदवारी करू इच्छिणाऱ्या धैर्यशील पाटील यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने अजित पवार यांचा भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी समन्वय असल्याचे समोर आले आहे. याशिवाय मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

निलेश राणेंनीच गाड्या फोडा म्हणून सांगितलं; भास्कर जाधवांचा आरोप
उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. म्हसळा शहरी भागासाठी मंजूर झालेल्या 43 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा प्रकल्प योजनेचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी रायगड लोकसभेवर भाजपचा दावा फेटाळून लावला.

यावेळी त्यांनी दावा केला की, विद्यमान खासदार सुनील तटकरे या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेला शाब्दिक वाद आता संपुष्टात येण्याची शक्यता असून या वादाला आता पूर्णविराम मिळाला आहे.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनावर भाष्य करत या आरक्षणासाठी 20 फेब्रुवारीला मंत्रिमंडळ विशेष अधिवेशन आयोजित करणार असल्याचे सांगितले. मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यावेळी उपस्थित होते.

दिल्लीसमोर लोटांगण घालायचे काम, आदित्य ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube