राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बायडेन बाहेर का पडले? जाणून घ्या 5 मोठी कारणे
Why US President Joe Biden Step Down Presidential Race : अमेरिकच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांना अन्यन्य साधारण महत्व आहे. निवडणुकांपूर्वी राष्ट्रध्यपदासाठी उमेदवारांमध्ये प्रेसिडेंशियल डिबेट पार पडली होती. यात ट्रम्प बायडेन यांच्यावर वरचढ झाल्याचे पाहण्यास मिळाले होते. मात्र, आता या निवडणुकीतून जो बायडन यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बायडेन (Joe Biden) यांनी एक पोस्ट लिहीली आहे. यात त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. तसेच डेमोक्रॅटिक पक्षाच्यावतीने उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत असल्याचेही नमुद केले आहे. परंतु, बायडेन यांनी राष्ट्रध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेण्यामागे अनेक कारण आहेत. त्यातील प्रमुख 5 कारणांबद्दल जाणून घेऊया.
Donald Trump : लेखिकेचे लैंगिक शोषण प्रकरणी ट्रम्प यांची साक्ष, बायडन सरकारवर गंभीर आरोप
बायडेनच्या माघारीची 5 मोठी कारणे
1. बायडेन विरुद्ध वाढता विरोध
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरलेल्या बायडेन यांच्या उमेदवारीबाबत डेमोक्रॅटिक पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात विरोध होता. प्रेसिडेंशन डिबेडमध्ये डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यासोबत पिछाडीवर पडल्यानंतर बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची मागणी केली जात होती. एवढेच नव्हे तर, माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि माजी स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनीही बायडेन यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचे आवाहन केले होते.
2. गोळीबाराच्या घटनेनंतर घटली लोकप्रियता
अमेरिकेत एका सभेला संबोधित करत असताना ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्याची घटना घडली होती. या प्राणघातक हल्ल्यात ट्रम्प थोडक्यात वाचले. मात्र, या गोळीबाराच्या घटनेनंतर बायडेन यांच्या लोकप्रियतेत कमालीची घट झाली आहे. तर, ट्रम्प यांना लोकांचा पाठिंबा वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळेदेखील बायडेन यांनी या निवडणुकीतून माघार घेण्यासाठी त्यांच्यावर दबाब होता. त्यातूनच त्यांनी माघार घेतल्याचे बोलले जात आहे.
बायडेन यांनी कहरच केला.. कट्टर शत्रूलाच बनवले मित्र; नाटो समिटमध्ये नक्की काय घडलं?
3. वाढते वय आणि कमकुवत स्मरणशक्ती
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे वाढते वय आणि कमकुवत स्मरणशक्ती यावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी बायडेन बोलताना अडखळतांना तर, कधी पडताना दिसले होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले गेले. याशिवाय नुकत्याच झालेल्या NATO समिटमध्ये त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना पुतिन असे संबोधले होते, इतकेच नव्हे तर, उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचे नावही बायडेन विसरले आणि त्यांना ट्रम्प असे संबोधले होते. त्यामुळेच बायडेन यांचे वाढते वय आणि मानसिक आरोग्य हा निवडणुकीचा मुद्दा बनवण्यात विरोधक सतत मग्न होते.
4. प्रेसिडेंशियल डिबेटमध्ये निराशाजनक कामगिरी
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रेसिडेंशियल डिबेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि बायडेन यांच्यात गेल्या महिन्यात पहिल्यांदा प्रेसिडेंशियल डिबेट पार पडली. यात अनेकदा बायडेन पिछाडीवर पडताना दिसले. तर, दुसरीकडे ट्रम्प यांनी बायडेन यांच्या प्रकृतीबाबत हल्लाबोल करताना दिसले. याशिवाय प्रेसिडेंशियल डिबेटनंतर बायडेन यांच्या निवडणूक प्रचाराला मिळणाऱ्या निधीतही घट झाल्याचे दिसून आले.
निवडणूक अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची अन् चर्चा आंध्र प्रदेश विरुद्ध तमिळनाडूची; काय कनेक्शन?
5. कोरोनामुळे कॅम्पेनमधून बाहेर
दिवसेंदिवस खराब होत असलेली बायडेन यांची प्रकृती हे देखील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाहेर पडण्याचे एक कारण असू शकते. बायडेन यांचे वय सध्या 81 एवढे असून, अनेक ठिकाणी ते अनफिट असल्याचे दिसून आले. तर, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये बायडेन दिवसात फक्त 6 तासच काम करू शकतात आणि त्यांना थकवा जाणवतो असा दावा करण्यात आला आला आहे. त्यात बायडेन यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अमेरिकेच्या हितासाठी घेतला निर्णय
राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेताना बायडेन यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी माघारीचा निर्णय अमेरिकेच्या हितासाठी घेत असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी त्यांच्या कार्यकाळातील निर्णयांचाही उल्लेख केला आहे. “गेल्या साडेतीन वर्षांत आपण एक राष्ट्र म्हणून खूप प्रगती केली आहे. आज अमेरिकेकडे जगातील सर्वात शक्तिशाली अर्थव्यवस्था आहे. परवडणारी हेल्थ केअर स्कीम, गन सेफ्टी लॉ आणि पर्यावरणाशी संबंधित कायदे असल्याचे नमुद केले आहे.