Download App

बाळासाहेब थोरात यांचा राजकीय वारसदार ठरला, लेकीचं राजकारणात पदार्पण

Lok Sabha Election 2024 : काही दिवसांवर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आल्या आहेत. या निवडणुकीपूर्वीचं राजकीय नेत्यांच्या मुलांचं लॉन्चिग सुरु झालं आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) यांनी आपण चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचं जाहीर केलं आहे. यानंतर आणखी एका नेत्यांच्या लेकीचं राजकारणात पदार्पण झालं आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची कन्याही आता राजकारणात सक्रीय होणार आहेत. जयश्री थोरात (Jayashree Thorat) यांची संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Loksabha elections : शिवानी वडेट्टीवार लोकसभा लढणार? कॉंग्रेसकडे केली तिकीटाची मागणी

Jayashree Thorat

गेल्या अनेक दशकांपासून थोरात कुटुंबाचं संगमनेर विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व आहे. बाळासाहेब थोरात यांचे वडील भाऊसाहेब थोरात देखील काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी मतदारसंघावर आपलं एकहाती वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. ते संगमनेरमधून सलग आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. काँग्रेस सत्तेत असताना त्यांच्याकडे महत्त्वाची मंत्रिपदं राहिली आहेत. काँग्रेसच्या पडत्या काळात त्यांनी पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद सांभळलं होतं. त्यानंतर आता जयश्री थोरात यांनी देखील सक्रीय राजकारणात प्रवेश केला आहे.

निवडणुका आल्या की विशिष्ट धर्माला टार्गेट केल जातंय; बच्चू कडूंची राणा दाम्पत्यावर टीकास्त्र

बाळासाहेब थोरात यांना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निवडणुक लढवण्साठी आग्रह धरला जात आहे. भविष्यात बाळासाहेब थोरात दिल्लीच्या राजकारणात गेले तर जयश्री थोरात संगमनेरमधून विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता जयश्री थोरात यांना बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय वासरदार म्हणून पाहिलं जात आहे.

follow us