Download App

के. के. रेंज प्रश्नी सुजय विखेंचा मास्टर स्ट्रोक… लंके, तनपुरे क्लीन बोल्ड

Sujay Vikhe Patil: लष्कराच्या फायरिंग रेंजसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. फायरींग रेंजसाठी जमिनी देण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध आहे. यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये देखील आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र एकीकडे असे असताना दुसरीकडे खासदार सुजय विखे यांनी या प्रश्नावर मास्टर स्ट्रोक लगावत विरोधकांना प्रतिउत्तर दिले आहे. के. के.रेंजसाठी (K. K. Range) होऊ घातलेल्या जमिनीचे अधीग्रहण करण्यास राज्य सरकारने असमर्थता दर्शवली असल्याची खा. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी दिली.

नगर जिल्ह्यातील विविध प्रश्नाबाबत केंद्रीय संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांच्यासह संरक्षण विभागाचे आणि छावणी परिषद कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. खा. सुजय विखे पाटील यांनी या बैठकीत के.के.रेंजचा प्रश्न प्राधान्याने मांडला. राज्य सरकारच जमीनीचे अधिग्रहण करण्यास असमर्थता दर्शवित असल्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकर्यांना मोठा दिलासा मिळेल असे विखे पाटील म्हणाले.

CM शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे अजित पवारांच्या हाती द्यावी; राजू शेट्टींच्या वक्तव्याने खळबळ

विखेंची खेळी अन लंके, तनपुरे क्लीन बोल्ड
लष्कराच्या फायरिंग रेंजसाठी नगर, पारनेर, राहुरी या तीन तालुक्यांतील शेकडो एकर जमीन अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव सुरु होता. याच मुद्द्यावरून पारनेर मतदार संघाचे आमदार निलेश लंके व राहुरी मतदार संघाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विरोध दर्शवला होता. याच मुद्द्यावरून विखे विरुद्ध लंके तनपुरे असा सामना देखील रंगला होता.

मात्र आता के. के. रेंजसाठी जमिनी अधिग्रहित करण्यास राज्य सरकारने असमर्थता दर्शवली आहे, याची माहिती खुद्द खासदार सुजय विखे-पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे या प्रश्नावरून रान उठवणारे आमदार निलेश लंके आणि शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांना निरुत्तर करण्याचा प्रयत्न खासदार सुजय विखे यांनी केला असल्याचे दिसून येत आहे.

संजय राऊत सुप्रीम कोर्ट आहे का ? नार्वेकरांचं राऊतांना खोचक उत्तर

दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह काही दिवसांपूर्वी शिर्डी दौऱ्यावर आले असता के के रेंजचा मुद्दा उपस्थित झाला होता. यावेळी संबंधित शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेण्यात आल्या. याबाबत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे पाटील यांनी मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा देखील केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांचे नुकसान न करता के. के. रेंजचा प्रश्न सोडवू असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले होते.

Tags

follow us