CM शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे अजित पवारांच्या हाती द्यावी; राजू शेट्टींच्या वक्तव्याने खळबळ
Raju Shetty : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमच आक्रमक असणारे माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) पुन्हा आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळमधून आत्मक्लेष यात्रा काढण्यात आली. यावेळी शेट्टी यांनी राज्य सरकारच्या कारभारावर घणाघाती टीका केली. यावेळी शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कारभार किंबहुना सरकारची सूत्रं अजितदादांच्या हाती द्यावीत,असा सल्ला दिला.
मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे आता अजित पवार यांच्या हातात द्यावीत. राज्य सरकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच इशाऱ्यावर चालत आहे. अजित पवार हे साखर कारखानदारांचे कैवारी आहेत. शेतकरी आणि त्यांचे प्रश्नांची अजितदादांना चांगली जाण आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सगळी सूत्रं त्यांच्या हातात द्यावीत, असे राजू शेट्टी म्हणाले.
Maharashtra Politics : ठाकरे गटाला धक्का! पक्ष अन् चिन्हाची सुनावणी पुन्हा लांबणीवर
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रोश मोर्चाला आजपासून सुरुवात झाली. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात 522 किलोमीटरची ही पदयात्रा असणार आहे. ही पदयात्रा 22 दिवसांची आहे. 37 कारखान्यांनी गाळप केलेल्या तीन कोटी टन उसाचे 1200 कोटी रुपये वसूल करण्याच्या उद्देशाने ही यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेत हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत, अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील श्री दत्त सहकारी साखर कारखान्यापासून या यात्रेला प्रारंभ करण्यात आला. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने नाही. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी पदयात्रा काढत आहोत, असेही राजू शेट्टी म्हणाले.
के. के. रेंज प्रश्नी सुजय विखेंचा मास्टरस्ट्रोक… लंके, तनपुरे क्लीन बोल्ड