Download App

कर्डिले अध्यक्ष झाले अन् घुलेंचे बॅनर उतरले

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahmednagar District Central Cooperative Bank) अध्यक्षपदाची निवडणूक आज झाली. सकाळपासूनच नेवासा, शेवगाव व पाथर्डी तालुक्यांत घुले समर्थकांकडून चंद्रशेखर घुले (Chandrashekhar Gule) यांच्या विजयाचे बॅनर तयार करण्यात आले. जल्लोषाची तयारी जोमात झाली. सोशल मीडियावर विजयाची बातमी आली. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत घुलेंना अवघ्या एका मताने पराभवाचा धक्का बसला आणि जल्लोषाची तयारीला पराभवाचे ग्रहण लागले.

विखेंचा अजितदादांना झटका; जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी शिवाजी कर्डिले 

अध्यक्षपदाच्या निवडणुकी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल (मंगळवारी) यांनी बैठका घेऊन घुलेंचे नाव निश्चित केले होते. बँकेत महाविकास आघाडीचे बहुमत असल्याने घुलेच अध्यक्ष होणार असा विश्वास घुले समर्थकांना होता. त्यामुळे बॅनर, गुलाल, डिजे अशी जोरदार तयारी झाली होती. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या घटकेला माजी मंत्री शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांच्या उमेदवारी अर्जाची एन्ट्री झाली आणि घुले समर्थकांच्या उत्साहात विरजण पडले. कर्डिले-विखे काय करणार यावर चर्चा सुरू झाल्या.

Devendra Fadanvis : फडणवीसांनी सांगितले विरोधकांचे राजकारण; म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर..

कर्डिलेंनी विखे गटाच्या जोरावर चंद्रशेखर घुले यांचा एक मताने पराभव करत अध्यक्षपद मिळविले. हे कळताच कोणाशीही न बोलता चंद्रशेखर घुले यांनी तडका फडकी सभागृह सोडले. डिजे समोर स्मशान शांतता पसरली. गुलालाचे पोते तसेच पडून राहिले. सोशल मीडियावर विजयाच्या टाकलेल्या पोस्ट डिलिट होऊ लागल्या. घुलेंच्या विजयाला मात्र कर्डिले-विखेंचे ग्रहण लागले.

Tags

follow us