Devendra Fadanvis : फडणवीसांनी सांगितले विरोधकांचे राजकारण; म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर..

Devendra Fadanvis : फडणवीसांनी सांगितले विरोधकांचे राजकारण; म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर..

Maharashtra Budget : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात (Maharashtra Budget) राज्यातील अवकाळी पावसाचा मुद्दा चांगलाच गाजला. या मुद्द्यावर आज चर्चा व्हावी ही मागणी लावून धरली. फक्त शेतकऱ्यांच्याच प्रश्नांवर चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला. मात्र यास विधानसभा अध्यक्षांनी नकार दिल्याने संतप्त होत विरोधी पक्षांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला. यावर फडणवीस यांनी जोरदार टीका केली.

फडणवीस म्हणाले, की विरोधकांना या महत्वाच्या प्रश्नावर फक्त राजकारण करायचे आहे. सरकाकडून शेतकऱ्यांनी भरीव मदत देण्यात येणार आहे. तरी देखील विरोधक सभात्याग करत आहेत. त्यांचे हे अश्रू म्हणजे मगरीचे अश्रू आहेत अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

वाचा : Devendra Fadanvis : पुण्यातील ‘त्या’ घटनेबाबत फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण 

याआधी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती त्यांनी दिली. अवकाळी पावसामुळे राज्यातील 13 हजार 729 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये आंबा, द्राक्ष, गहू, हरभरा, ज्वारी या पिकांचा समावेश आहे. शासनाने नुकसानग्रस्त भागातील माहिती तत्काळ मागविली आहे. त्यांनी नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. त्यामुळे या महत्वाच्या प्रश्नावर विरोधकांनी राजकारण करू नये असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जुनी पेन्शन योजना : Devendra Fadanvis यांचा अप्रत्यक्ष नकार!

याआधी छगन भुजबळ म्हणाले होते, की खरंतर आज या सरकारने सभागृहात काहीतरी ठोस सांगायला हवे होते. अवकाळी पावसाने झालेले नुकसान पाहता तातडीने अनुदान जाहीर करण्याची गरज होती. गुजरात सरकारने त्यांच्या राज्यात या पद्धतीने अनुदान दिले होते. मग, या सरकारला काय अडचण आहे ? हे सरकार मस्तीत दंग आहे अजूनही त्यांना का शेतकऱ्यांचे हाल दिसत नाहीत याचं मला फार वाईट वाटतं. यासाठीच आम्ही स्थगन प्रस्ताव आणला होता, असे भुजबळ यांनी सांगितले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube