Devendra Fadanvis : पुण्यातील ‘त्या’ घटनेबाबत फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण

Devendra Fadanvis :  पुण्यातील ‘त्या’ घटनेबाबत फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण

आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. यावेळी विरोधकांनी सरकारला अवकाळी पाऊस शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊसामुळे झालेल्या नुकसावरून घेरण्याचा प्रयत्न केला. सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्वरीत मदत करण्याची मागणी केली. यावेळी काही दिवसांपूर्वी पुण्यात घडलेल्या एका अघोरी घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात माहिती दिली आहे.

हे सुद्धा वाचा : आ. धसांना फडणवीसांचा धक्का, इनामी जमिनीचे चार महिन्यांत चौकशीचे आदेश

पुण्यात एका महिलेला गर्भधारणा व्हावी यासाठी अघोरी पद्धतीने पुजा करत मानवी हाडे आणि प्राण्यांच्या हाडांची पावडर सेवन करण्याचा अघोरीप्रकार समोर आला होता.
या घटनेनंतर पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली होती. या धक्कादायक घटनेनंतर पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात IPC आणि अंधश्रद्धाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे फडणवीसांनी यावेळी सभागृहात सांगितले.

आम्ही विरोधकांना माफ केलं फडणवीसाचं मोठं विधान

घटना नेमकी काय?

पीडित महिलेला गर्भधारणा व्हावी यासाठी तिच्या कुटुंबियांनी एका अमावस्येच्यादिवशी पतीसह पीडितेला जवळील स्माशानात नेले, येथून प्रेताची हाडे आणि राख घरी आणली त्यानंतर बळजबरीने ही राख पाण्यात टाकून ती पिण्यास भाग पाडले. या सर्व प्रकाराला कंटाळून अखेर पीडितेने पोलीस स्टेशन गाठत घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर सिंहगड पोलिसांनी अघोरी पूजेच्या नावाखाली मानव आणि प्राण्यांच्या हाडांच्या पावडरचे सेवन करण्यास भाग पाडलेल्या महिलेच्या कुटुंबाविरूद्ध IPC आणि अंधश्रद्धा विरोधी कायद्यानुसार 18 जानेवारी रोजी एफआयआर नोंदविला असल्याचे फडणवीसांनी यावेळी सभागृहात सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube