Download App

संजू राठोडच्या गुलाबी साडी गाण्यावर महिलांनी धरला ताल, दांडिया स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आ.आशुतोष काळे यांच्या वतीने यावर्षी नवरात्र महोत्सव भव्य दिव्य पद्धतीने साजरा करतांना भव्य दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

  • Written By: Last Updated:

Kopargaon Navratri festival organize MLA Ashutosh Kale : कोपरगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आणि आ. आशुतोष काळ (Ashutosh Kale) यांच्या वतीने नवरात्रौत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘जागर स्त्री शक्तीचा’ नवरात्र उत्सव कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या भव्य दांडिया स्पर्धेला महिलांचा उस्त्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी दांडिया स्पर्धेचे मुख्य आकर्षण असलेला गुलाबी साडी फेम संजू राठोड (Sanju Rathore) यांच्या गुलाबी साडी या गाण्यावर उपस्थित हजारो महिलांनी चांगलाच ठेका धरला होता.

विधानसभेसाठी ‘मनसे’ सज्ज, मुंबईत ‘या’ दिवशी राज ठाकरेंची तोफ धडाडणार 

प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आणि आ.आशुतोष काळे यांच्या वतीने यावर्षी नवरात्र महोत्सव भव्य दिव्य पद्धतीने साजरा करतांना भव्य दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा रविवार (दि. ०६) व सोमवार (दि. ०७) रोजी दोन दिवस घेण्यात आली. या स्पर्धेसाठी रविवार (दि. ०६) रोजी गुलाबी साडी फेम संजू राठोडला निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी लहान गट व खुल्या गटातील दांडिया स्पर्धकांनी अतिशय तालबद्ध पद्धतीने दांडिया खेळाचे प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकून घेतली. तर या दांडिया स्पर्धेचा मुख्य आकर्षण असलेला संजू राठोड यांनी ‘गुलाबी साडी आणि लाली लाल लाल…दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ’ आणि ‘नऊवारी साडी’ या गाण्यावर आपल्या जादुई आवाजाने उपस्थित हजारो महिलांना ताल धरायला लावला.

अभिनेत्री सुहास जोशींना विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर, 5 नोव्हेंबरला होणार पुरस्कारचे वितरण 

सिनेसृष्टीत आपल्या जिद्दीच्या जोरावर स्थान निर्माण करणारा गायक संजू राठोड  नवनवीन गाण्यांमुळे अल्पावधीतच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला. त्यांच्या कित्येक गाण्यांनी सर्व प्रेक्षकांना अक्षरश:भुरळ घातली आहे. त्याच संजू राठोड यांना पाहण्यासाठी व ‘गुलाबी साडी’ हे गाणं ऐकण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर महिलांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी आ.आशुतोष काळे आणि चैतालीताई काळे यांनी देखील गुलाबी साडीच्या गाण्यावर ताल धरत दांडिया स्पर्धक व उपस्थित महिलांचा उत्साह वाढविला.

Nitesh Rane vs Sanjay Raut | राऊतांचा वार अन् राणेंचा पलटवार | LetsUpp Marathi

आ. आशुतोष काळे जिगरबाज नेतृत्व
कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी तीन हजार कोटी निधी आणणे सोपी गोष्ट नाही. त्यासाठी जिगर लागते आणि हे काम फक्त जिगरबाज व्यक्तीच करू शकतात. अशी अद्भुत कामगिरी करून दाखविणारे आ. आशुतोष काळे जिगरबाज नेतृत्व आहे
-संजू राठोड

follow us