अभिनेत्री सुहास जोशींना विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर, 5 नोव्हेंबरला होणार पुरस्कारचे वितरण

अभिनेत्री सुहास जोशींना विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर, 5 नोव्हेंबरला होणार पुरस्कारचे वितरण

Vishnudas Bhave Award announced to Suhas Joshi : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा विष्णुदास भावे गौरवपदक पुरस्कार (Vishnudas Bhave Award) यंदा ज्येष्ठ अभिनेत्री सुहास  उर्फ  सुहासिनी जोशी (Suhas Joshi) यांना जाहीर झाला. सुहास जोशींनी मराठी चित्रपट, दूरदर्शन, नाट्य प्रशिक्षिका अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल नाट्यविश्वातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.

Singham Again : रणवीर सिंग म्हणतो, टायगर श्रॉफ माझा ‘मॅन क्रश’! 

अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर संस्था, सांगली यांच्यातर्फे दरवर्षी रंगभूमी दिनानिमित्त विष्णूदास भावे गौरव पुरस्कार दिला जातो. नाट्यक्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या कलाकारांना हा पुरस्कार दिला जातो. यंदा या पुरस्काराचे 57 वे वर्ष असून यंदाचा पुरस्कार सुहास जोशींना जाहीर झाला. गौरव पदक, 25,000 रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 5 नोव्हेंबरला रंगभूमीदिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार सिने दिग्दर्शनक जब्बार पटेलांच्या हस्ते सुहाश जोशींना प्रदान करण्यात येणार आहे.

कोल्हेंनी आपले रंग दाखवून विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचे नसल्याचे सिद्ध केले; गोवर्धन परजणेंची टीका 

सुहास सुभाष जोशी यांचा जन्म 12 जुलै 1947 रोजी झाला. त्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री असून त्यांनी अनेक मराठी नाटकं, चित्रपट, हिंदी चित्रपट तसंच मराठी आणि हिंदी टीव्ही मालिकांमध्येही काम केलं. त्यांच्या अभिनयाच्या प्रदीर्घ आणि भरीघ कामगिरीबद्दल 2018 सालचा संगीत नाटक अकादमीचा प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर जाहीर झाला होता.

पुण्यात कॉलेजच्या दिवसांपासून त्यांना नाटकाचा लळा लागला होता. पुढं इब्राहिम अल्काझी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले. त्यानंतर ‘बॅरिस्टर’ या नाटकाद्वारे त्या मुख्य प्रवाहात आल्या. गंभीर अभिनयासोबतच त्यांच्या विनोदी भूमिकाही चांगल्याच गाजल्या. ‘सखे शेजारी’, ‘कन्यादान’ ‘एकच प्याला’, ‘नटसम्राट’ अशा गाजलेल्या नाटकांतूनही त्यांनी आपली छाप पाडली. तर आनंदी आनंद, मुंबई पुणे मुंबई हे त्यांची गाजलेले मराठी चित्रपट आहेत.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या