कोल्हेंनी आपले रंग दाखवून विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचे नसल्याचे सिद्ध केले; गोवर्धन परजणेंची टीका
Kopargaon Politics : राजकीय श्रेय लाटण्यासाठी शिरसगाव कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या (Shirasgaon Agricultural Produce Upmarket Committee) आवारात काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्याचा एकतर्फी निर्णय कोल्हे गटाने घेतला. कोल्हे गटाने आपले रंग दाखवून आपण विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचे नसल्याचे दाखवून दिलं, अशी टीका कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे (Govardhan Parjane) यांनी केली.
भाजप नेत्यांनी चांगली वागणूक दिली पण त्यांना…; हर्षवर्धन पाटलांनी A टू Z सगळचं सांगितलं
गोवर्धन परजणे यांनी एक प्रसिध्द पत्रक जारी केलं. त्यात लिहिलं की, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांची आहे. याठिकाणी कोणत्याही प्रकारचे राजकारण आणायचे नाही, असं ठरलं होतं. मात्र, राजकीय श्रेय घेण्यासाठी कोल्हे गटाने काळे, परजणे, औताडे गटाच्या संचालकांना विश्वासात न घेता शिरसगाव कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या आवारात काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्याचा घाट घातलाय. त्या कार्यक्रमावर काळे, परजणे, औताडे गटाचे संचालक बहिष्कार टाकून निषेध नोंदवणार आहे.
लेकीच्या जीवासाठी AI च्या जंजाळातील बापाची थरारक गोष्ट! ‘द AI धर्मा स्टोरी’चा रंजक ट्रेलर रिलीज
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काळे, कोल्हे, परजणे, औताडे यांच्या गटाचे सदस्य असून सभापती पद कोल्हे गटाकडे तर उपसभापतीपद काळे गटाकडे आहे. दरम्यान, या पत्रकात पुढं लिहिलं की, वास्तविक पाहता कृषी उत्पन्न बाजार समितीला आ. आशुतोष काळे, मा.जि. प. सदस्य राजेश परजणे, शिवसेना नेते नितीन औताडे यांचे वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन मिळत आले आहे. आजपर्यंत सर्व संचालकांनी एकत्रितपणे निर्णय घेवून सहमतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचा कार्यभार चालवला. राजकीय जोडे बाजूला ठेवून आजवर निर्णय घेतले गेले आहे. मात्र, आता राजकीय श्रेय घेण्यासाठी कोल्हे गटाने शिरसगाव कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या आवारात ५५ लक्ष रुपये खर्च करून काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्याचा निर्णय घेतला. मुळात हा निर्णयच घटनाबाह्य असल्याचे या पत्रकात म्हटलं.
शिरसगाव कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या आवारात सोमवार (दि.०७) रोजी काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्याचा निर्णय घेतांना काळे, परजणे, औताडे यांच्या गटाच्या एकाही संचालकांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे आमचा या कार्यक्रमाला विरोध आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीतील कामे मार्गी लागावे व शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी सहाय्यक निबंधकापासून ते पणन संचालकापर्यंत सर्वच संचालकांनी प्रयत्न करून आ.आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून कामे मंजूर करून आणली. याकामी राजेश परजणे, शिवसेना नेते नितीन औताडे यांचे सहकार्य लाभले आहे. यापूर्वीच या कामांना गती द्यावी असे वारंवार काळे, परजणे, औताडे गटाच्या संचालकांनी सांगितले. मात्र पुढे असे कुटील कारस्थान करायचे असल्यामुळे त्याबाबत त्यावेळी टाळाटाळ केली गेली, हे यावरून दिसून येत आहे, असंही या पत्रकात म्हटलं.
संचालक मंडळाचा ठराव नसतांना, कार्यारंभ आदेश देखील काढलेला नसतांना केवळ राजकीय श्रेय लाटण्यासाठी हा काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्याचा एकतर्फी निर्णय घेवून कोल्हे गटाने आपले रंग दाखवून दिले. कोल्हे विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचे नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झालंय, त्यामुळे शिरसगाव कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या आवारात होणाऱ्या काँक्रीटीकरण कामाच्या शुभारंभ कार्यक्रमावर काळे, परजणे, औताडे गटाचे संचालक बहिष्कार टाकून निषेध नोंदवणार असल्याचे परजणे यांच्या बरोबरच संचालक संजय शिंदे, शिवाजीराव देवकर, राजेद्र निकोले, रामदास केकाण, ऋषिकेश सांगळे, लक्ष्मणराव शिंदे, खंडू फेफाळे, अशोकराव नवले, मीरा कदम यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.