पाच वर्षात कोणते प्रश्न सुटले? कामांची यादी वाचत काळेंनी व्हिजनही सांगितलं…
Mla Ashutosh Kale : आगामी विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेच्या फैरी झडत आहेत. कोपरगाव विधानसभा (Kopargaon Election) मतदारसंघात विद्यमान आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांच्यावर विरोधक सातत्याने टीका करत आहेत. कोपरगावचा विकास रखडला, युवकांचा रोजगार बुडवला अशी टीका आमदार काळेंवर होत आहे. दरम्यान, विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला आता आमदार काळेंनी प्रत्युत्तर देत आपण पाच वर्षात कोणते प्रश्न सोडवले याची यादीच वाचून दाखवली.
Santosh Juvekar: संतोष जुवेकरचा खतरनाक ‘रानटी’ अंदाज; चित्रपट लवकरच येणार भेटीला
आमदार काळेंनी लेट्सअप मराठीला मुलाखत दिली. यावेळी बोलतांना त्यांना अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना 2019 ला तुम्ही आंदोलन केलं होतं. ज्या प्रश्नांसाठी ते आंदोलन होतं, ते प्रश्न सुटले का? की ते आंदोलन फक्त राजकीय ड्रामा होता? असा सवाल आमदार काळेंना विचारला असता ते म्हणाले की, ज्या प्रश्नांसाठी मी आंदोलन केलं होतं, त्यातील बहुतेक प्रश्न सोडवून लोकांना न्याय मिळवून दिला. गेल्या पाच वर्षात प्रामुख्याने कोपरगावचा पाणी प्रश्न सोडवला. त्यासाठीच मी धरणे आंदोलन केलं होतं. काही प्रश्न तात्कालिक होते. म्हणजे, 2019 मध्ये कोपरगावमध्ये दुष्काळ पडला होता. मात्र, तेव्हा तालुका दुष्काळ यादीत समाविष्ट झाला नव्हता. त्यासाठीही लढा दिला. गोदावरी कालव्याच्या नुतणीकराला निधी मिळावा, यासाठी प्रयत्न केला. शेवटी नुतणीकरणासाठी निधी मिळाला, सध्या कालव्याचे काम जोरात सुरू आहे. नव्यानेही या कामांसाठी निधी मंजूर झाला आहे, असं काळे म्हणाले.
चीनचा डाव भारतीय गुंतवणूकदारांना महागात पडण्याची शक्यता, पुढील आठवड्यात होणार मोठी घोषणा
गेल्या पाच वर्षात सत्ताधारी आमदारांना काहीच काम केली नाहीत, असं विरोधक आकडेवारीनिशी बोलत आहेत. याविषयी विचारलं असता कोळे म्हणाले की, त्यांची आकडेवारी किती खरी, किती खोटी त्यांचं त्यांनाच ठाऊक. माझी निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरच राहणार आहे. आम्ही कधी कुणाला खोटा शब्द दिला नाही. जो शब्द दिलो, तो पाळला. मी देखील 2019 ला जो शब्द दिला, तो पूर्णच केला. आम्ही शब्दाचे पक्के आहोत.
आमचे विरोधक ‘लबाड कोल्हे’
पाच वर्षात मतदारंसघात अनेक विकासकामे केली. 2019 ला जो शब्द दिला, तो पूर्णच केला. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. मात्र, लबाड कोल्हा जसं भूलथापा देत असतो, तसे आमचे विरोधक आहेत. ते काहीही सांगून लोकांना भूलवतात, अशी टीका करत शेवटी मी केलेली कामे लोकांसमोर आहेत. जनता योग्य निर्णय घेईल, असं काळे म्हणाले.