विधानसभेसाठी ‘मनसे’ सज्ज, मुंबईत ‘या’ दिवशी राज ठाकरेंची तोफ धडाडणार
Raj Thackeray : राज्यात येत्या काही दिवसात केंद्रीय निवडणूक आयोग विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhan Sabha Election) घोषणा करणार आहे. माहितीनुसार, राज्यात 13 किंवा 14 ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीने (Mahayuti) आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे.
तर दुसरीकडे विधानसभेसाठी राज ठाकरे (Raj Thackeray) देखील विधानसभेसाठी सज्ज झाले आहे. मनसेकडून (MNS) विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरु करण्यात आली आहे. तर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे 13 ऑक्टोबर रोजी गोरेगाव नेस्को मैदानावर पक्षाच्या गटाध्यक्षांना संबोधित करण्यासाठी सभा घेणार आहे. या सभेत राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे देखील संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठींबा जाहीर केला होता मात्र विधानसभेसाठी राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे विधानसभेसाठी अनेक बैठका घेत आहे. आज देखील राज ठाकरे यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यात घेतली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत या शहरात राज ठाकरे उमेदवार देणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. ऑगस्ट महिन्या राज ठाकरे यांनी मनसे आगामी विधानसभा निवडणुकीत 200 ते 225 जागा लढवेल अशी घोषणा केली होती. त्यामुळे 13 ऑक्टोबर रोजी गोरेगाव नेस्को मैदानावर होणाऱ्या सभेत राज ठाकरे कोणती घोषणा करणार याबाबत सध्या राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहे.
Singham Again : रणवीर सिंग म्हणतो, टायगर श्रॉफ माझा ‘मॅन क्रश’!
तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत महायुतीला 48 जागांपैकी अवघ्या 17 जागांवर विजय मिळवता आला होता तर महाविकास आघाडीने राज्यात 31 जागांवर विजय मिळवला होता.