Download App

कोपरगावचा वाद मिटला! कोल्हे कुटुंबियांनी घेतली अमित शहांची भेट, भेटीत चर्चा काय?

कोपरगाव मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या कोल्हे कुटुंबियांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतलीयं.

Snehalata Kolhe Meet Amit Shah : कोपरगाव मतदारसंघात (Kopargoan Assembly Election) महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या कोल्हे कुटुंबियांची नाराजी दूर करण्यासाठी खुद्द केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मध्यस्थी केलीयं. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांना उमेदवारी देण्यात आल्याने कोल्हे कुटुंबिय नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. स्नेहलता कोल्हे (Snehalata Kolhe) आणि विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी थेट अमित शाहांची भेट घेत सकारात्मक चर्चा केली असल्याची माहिती स्वत: विवेक कोल्हेंनी समाजमाध्यमांवर दिलीयं.

विवेक कोल्हे यांनी समाजमाध्यमांवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं, “केंद्रीय गृहमंत्री व देशाचे पहिले सहकार मंत्री अमितजी शाह साहेब यांची दिल्ली येथे भेट झाली.राज्यातील महायुतीमध्ये कोपरगाव विधानसभेचा निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कोल्हे कुटंबाची दखल घेवून सकारात्मक दृष्टीकोन दाखवला आहे. आगामी काळात राजकीय ताकद देऊन कोल्हे कुटुंबाचा स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांनी जपलेला सेवा हाच धर्माचा वारसा जोमाने पुढे नेण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने सकारात्मक विश्वास दिला आहे.या चर्चेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे उपस्थित होत्या. यावेळी सन्माननिय अमितजी शाह साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या” असं कोल्हेंनी स्पष्ट केलंय.

कोपरगाव मतदारसंघात कोल्हे आणि काळे कुटुंबाचा पारंपारिक वाद आहे. अशातच याच मतदारसंघात राष्ट्रवादीचे आशुतोष काळे हे विद्यमान आमदार आहेत. यंदाच्या निवडणुकीत विवेक कोल्हे हे भाजपकडून इच्छूक होते. मात्र, कोपरगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचा विद्यमान आमदार असल्याने ही जागा राष्ट्रवादीकडेच राहिली. पर्यायी कोल्हे यांना उमेदवारीला मुकावे लागले.

जया बच्चन यांच्या आईच्या निधनाची बातमी खोटी; इंदिरा भादुरी यांच्या पाठीचा कणा मोडल्याने रुग्णालयात दाखल

काळे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोल्हे यांना महाविकास आघाडीकडून ऑफर देत असल्याचंही समोर आलं होतं. यासंदर्भात खुद्द स्नेहलता कोल्हे यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही तुमचं पुनर्वसन करु पण भाजप सोडू नका, असा शब्द दिल्यानंत आज स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे यांनी अमित शाहांची भेट घेतलीयं. या भेटीत आगामी काळात कोल्हे कुटुंबियांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचं आश्वासन दिलं असल्याचं विवेक कोल्हे यांनी सांगितलंय.

दरम्यान, अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर यंदाच्या निवडणुकीतून कोल्हे कुटुंबियांनी माघार घेतल्याचं बोललं जातंय. आता माघार घेतल्यानंतर कोल्हे कुटुंब या निवडणुकीत पक्षासाठी पारंपारिक वाद विसरुन राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांना मदत करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

follow us