ई फायलिंगला वकिलांचा विरोध

नगर : न्यायालयाचे कामकाज ई फायलिंगद्वारे चालवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ई फायलिंगच्या निर्णयाला अहमदनगर जिल्हा न्यायालयातील सर्व वकिलांचा विरोध आहे. वकील संघटनेने आज या निर्णयाचा निषेध करत लाल फिती लाऊन कामकाज केले. वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड.संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत या बंधनकारक निर्णयास सर्व वकिलांनी जाहीरपणे विरोध केला. तसेच तसा ठराव […]

Untitled Design (1)

Untitled Design (1)

नगर : न्यायालयाचे कामकाज ई फायलिंगद्वारे चालवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ई फायलिंगच्या निर्णयाला अहमदनगर जिल्हा न्यायालयातील सर्व वकिलांचा विरोध आहे. वकील संघटनेने आज या निर्णयाचा निषेध करत लाल फिती लाऊन कामकाज केले.

वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड.संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत या बंधनकारक निर्णयास सर्व वकिलांनी जाहीरपणे विरोध केला. तसेच तसा ठराव एकमताने मंजूर करणात आला.

त्या ठरावाच्या कॉपी सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय, अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय व महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षांना पाठवण्यात आला आहे. न्यायालयाबाहेर वकिलांनी निर्णयाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी ज्येष्ठ वकील माणिकराव मोरे, अ‍ॅड. सुचिता कुलकर्णी, अ‍ॅड. मीना शुक्रे, वकील संघटनेचे सचिव अ‍ॅड.गौरव दांगट, सेन्ट्रल बारचे उपाध्यक्ष अ‍ॅड.विजय भगत, अ‍ॅड.विक्रम वाडेकर आदी उपस्थित होते.

Exit mobile version