घरात घुसला अन् बाथरूममध्ये फसला…अहिल्यानगर शहराजवळील बिबट्या अखेर जेरबंद

भिंगारमध्ये घुसलेला बिबट्या एका घरामध्ये शिरला व बाथरूममध्ये घुसला. त्यानंतर वनविभागाने बिबट्याला जेरबंद केले आहे.

Leopard in ahilanagar

Leopard in ahilanagar

Leopard caught in Ahilyanagar:गेल्या काही दिवसांपासून नगर शहरासह जिल्ह्यात बिबट्याचा मोठा वावर वाढला आहे. बिबट्या (Leopard)थेट आता मनुष्य वस्तीकडे येत असल्याने नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अहिल्यानगर शहराजवळ असलेल्या भिंगारमध्ये (Bhingar) बिबट्या आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. बिबट्याला पकडताना वनविभागाची तारांबळ उडाली. काही वेळाने एका घरात घुसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे. तब्बल तीन तास वनविभागाला बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न करावे लागले.


अजित पवार विमान दुर्घटना प्रकरणात मोठी अपडेट; रोहित पवारांचा दिल्लीतील गुप्तहेर संस्थेशी संपर्क

अहिल्यानगर शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार हा आढळून आला. तसेच ग्रामीण भागात मनुष्यवस्तीमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ले केले आहेत. यामध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. यातच आता पुन्हा एकदा शहरीवस्ती मध्ये बिबट्या आला असल्याने भीतीचे सावट निर्माण झाले आहे.


वकील देण्यासाठी पैसे नव्हते, बारावीच्या विद्यार्थ्याने स्वतः युक्तिवाद करत निकाल बदलवला

भिंगार शहरातील वारूळ वाडी परिसरात बिबट्या हा सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आढळून आला. काही नागरिकांनी त्याला पाहताच आरडाओरड केल्याने बिबट्या हा एका इमारतीकडे पळाला त्यानंतर नागरिकांनी तातडीने वनविभागाला फोन द्वारे संपर्क साधत घटनेची कल्पना दिली. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी घराच्या छतावर गर्दी करू लागले. दरम्यान भेदरलेला बिबट्या एका घरामध्ये शिरला व बाथरूम मध्ये जाऊन बसला व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल तीन तासाच्या शर्थीच्या प्रयत्नाने त्याला अखेर जेरबंद केले.

Exit mobile version