VIDEO: चांदबिबी महाल भागात पुन्हा बिबट्या दिसला; नागरिकांनो सावध राहा !

leopards found again Chandbibi Mahal: भागात पर्यटनासाठी, फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे.

Leopard Ahilynagar

Leopard Ahilynagar

leopards found again Chandbibi Mahal: अहिल्यानगर शहरापासून (Ahilyanagar City) हाकेच्या अंतरावर असलेल्या पाथर्डी रस्त्यावरील चांदबिबी परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचे (leopards) दर्शन झाले आहे. फिरण्यासाठी गेलेल्या एका नागरिकाला झाडाझुडपामध्ये बिबट्या दिसून आला आहे. या बिबट्याचे व्हिडिओ शूटिंगही त्या व्यक्तीने काढले आहे. त्यामुळे या भागात पर्यटनासाठी, फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे.

शिंदे गटाच्या चार नेत्यांची SIT चौकशी करा; संजय राऊतांनी थेट नावं घेत CM फडणवीसांकडे केली मोठी मागणी

चांदबिबी महाल परिसरात अनेकदा बिबट्याचे दर्शन झाल्याची चर्चा होती. त्याचे अनेकदा फोटोही व्हायरल झाले होते. सहा महिन्यांपूर्वीही येथे एक मादी व तिचे दोन पिल्ले आढळून आले होते. आता पुन्हा एकदा शुक्रवारी रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्या आढळून आला आहे. कारमधून एका व्यक्तीने या बिबट्याचा व्हिडिओ शूट केला आहे.

Jalgaon Crime : खेळातलं वैर जीवावर बेतलं; शाळेच्या मैदानावरच मारहाण, नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

याबाबत जैवविविधता संवर्धन व संशोधनचे संस्थेचे प्रमुख ऋषिकेश परदेशी म्हणाले, या भागात आढळलेली मादी आहे. त्यामुळे तिचे पिल्लेही या भागात असण्याची शक्यता आहे. त्याभागात वन्यप्राण्यासाठी पाणवठे तयार केलेले आहेत. त्यामुळे बिबट्या या भागात वावर असावा. महालावर जाणारा रोड, गर्भगिरीकडे जाणाऱ्या रोडवरील भागात तो फिरतो.


रात्री व पहाटे फिरणाऱ्यांनी सावधानता बाळगावी

या भागात सायंकाळी सहानंतर नागरिकांनी थांबू नये, कारण रात्रीच्या वेळी बिबट्याकडून हल्ला होऊ शकतो. तर पहाटे फिरण्यासाठी जाणाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन ऋषिकेश परदेशी केली आहे. या भागात पोलिस व वनविभागाने गस्त घातली पाहिजे, नागरिकांना सावध केले पाहिजे, असे मत परदेशी यांचे आहे.

Exit mobile version