Download App

Lok Sabha Election 2024 मध्ये हिवरेबाजार जपणार गावाची ‘ती’ परंपरा

Lok Sabha Election 2024 Hivarebajar Preserve tradition : लोकसभा निवडणूकीची ( Lok Sabha Election 2024 ) धामधूम सध्या सुरू असून पारनेर-नगर मतदारसंघातील हिवरेबाजार ( Hivarebajar ) हे गाव या निवडणूकीतही आदर्शगाव म्हणून देशात नावाजलेले हिवरे बाजार आपल्या गावाची परंपरा जपणार ( Preserve tradition ) आहे.

Tesla Car : टाटांना आव्हान देण्यासाठी अंबानी आणि मस्क एकत्र येणार! काय आहे प्लॅन?

या गावात कोणालाही मतदानाची सक्ती केली जात नसून कोणत्याही पक्षाचा पोलिंग एजंट न देता गावकरीच उमेदवाराच्या सल्ल्याने पोलिंग एजंटची नियुक्‍ती करतात. हिवरेबाजार ग्रामस्थांच्या वतीने विविध राजकीय पक्षांना आवाहन करण्यात आले असून कोणत्याही मतदाराला मतदानाची सक्ती करण्यात येणार नसून परंपरेप्रमाणे मतदानाच्या वेळी गावकरीच पोलिंग एजंट देणार आहेत, अशी माहिती पदमश्री पुरस्कार प्राप्त पोपटराव पवार यांनी दिली.

‘वंचित’च्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट; आंबेडकरांचा काँग्रेसला सज्जड दम

गुढीपाडवा निमित्ताने आयोजित ग्रामस्थ सभेत चर्चा झाली असून मतदानासाठी मतदारांसाठी ग्रामस्थांच्या वतीने वाहनांची व्यवस्था करण्यात येणार असून आचार संहितेचे पालन काटेकोरपणे करण्यात येणार आहे. हिवरे बाजारच्या ५००/१००० मतांचा कोणत्याही पक्षाच्या उमेदवारास फारसा फरक पडत नाही. हिवरे बाजार ग्रामस्थांच्या प्रामाणिक प्रयत्नातून तसेच गावाला प्रामणिकपणे सहकार्य करणारे सर्वपक्षीय राज्यकर्ते, प्रशासन यांच्यामुळे हिवरे बाजार पाहण्यासाठी दररोज राज्यातून, देशातून मोठया प्रमाणावर अभ्यास सहली येतात. त्यामुळे हिवरे बाजार हे ग्रामविकासाचे प्रेरणास्थान झाले आहे.

Ramayana: श्रीरामाच्या भूमिकेसाठी रणबीरनं घेतलं तगडं मानधन, आकडा वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

सन १९९० सालापासून प्रत्येक पंचवार्षिक निवडणूकांना सर्व ग्रामस्थ एकत्र बसून कुठलीही सक्ती न करता कोणाच्याही अमिषाला बळी न पडता ९० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान घडवून आणत आहेत. तसेच प्रत्यक्ष उमेदवार जर हिवरे बाजार भेटीला आले तर ग्रामस्थ त्यांना श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत देखील करतात असेही पवार यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, यासारखा निवडणुकांमध्ये कधीही पोलिंग एजंट अथवा बूथ यासारखा आग्रह कोणत्याही पक्षाने धरला नाही. यामुळेच हिवरे बाजार चा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान झाला असेही यावेळी पोपटराव पवार म्हणाले.

follow us