Download App

Lok Sabha Election : नाशिक महायुतीत घमासान! गोडसेंचं शक्तीप्रदर्शन; भाजप इच्छुकांची मुंबईत धडक

Lok Sabha Election : राज्यात अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा गुंता सुटलेला नाही. महायुतीत काही जागांवरून ताणाताणी सुरू आहे. त्यात नाशिक मतदारसंघाचे नाव आहे. या मतदारसंघात शिंदे गटाचा खासदार आहे. त्यामुळे ही जागा आपल्यालाच मिळावी असा दावा शिंदे गटाने केला आहे. तर दुसरीकडे भाजपनेही या जागेसाठी जोर लावल्याची माहिती आहे. काल नाशिकमधील फरांदे, हिरे यांच्यासह इच्छुकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे आता नाशिकवरूनही शिंदे आणि भाजपात घमासान होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दरम्यान, या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. (Lok Sabha Election 2024 Nashik interested candidates and four mla meet Devendra Fadnavis)

Ahmednagar loksabha Election : लंकेंचं तळ्यात-मळ्यात तर विखेंकडून निवडणुकीची मोर्चेबांधणी 

भाजप इच्छुकांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि नाशिकची जागा भाजपाला मिळावी अशी मागणी केली. या मुद्द्यावर फडणवीस यांनी चर्चा केली. यानंतर आमदार देवयानी फरांदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, आजच्या घडीला आमचे तीन आमदार आणि 100 नगरसेवक आहेत. त्यामुळे नाशिकची जागा भाजपाला मिळावी अशी मागणी केली होती. ही जागा भाजपालाच मिळावी अशी आमची मनापासून मागणी आहे.

नाशिकच्या जागेवर मनसेनेही दावा केला आहे. नाशिक आणि शिर्डी मतदारसंघांची मागणी मनसेने केल्याची माहिती आहे. यावरून महायुतीत धुसफूस अधिकच वाढल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी सु्द्धा या जागेवर दावा सांगितला आहे. यावर फरांदे म्हणाल्या, सगळेच जागा मागतील. पण ज्यांची राजकीय ताकद जास्त आहे त्यांनाच जागा मिळाली पाहिजे.

राज ठाकरेंचा तीन जागांवर दावा, ‘नाशिक’च्या मागणीने भाजप-शिंदे सेनेत अस्वस्थता

दरम्यान, काही दिवसांपूर्वी खासदार हेमंत गोडसे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. त्यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांचं नाव जाहीर केलं होतं. त्यावरून महायुतीत वाद वाढला आहे. भाजप नेत्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. या जागेसाठी भाजपनेही जोर लावण्यास सुरुवात केली. आता अशा परिस्थितीत हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

follow us