Download App

Jayant Patil : “नगरसाठी उमेदवार देणार, निवडूनही येणार”; जयंत पाटलांची राऊतांवर ‘कडी’

Jayant Patil : शिर्डी लोकसभेची जागा शिवसेना लढणारच आहे पण नगर दक्षिणेची जागा राष्ट्रवादीने सोडली तर ही जागाही आम्ही लढवू. आमच्याकडे उमेदवारही तयार आहे असे शरद पवार गटाला डिवचणारे वक्तव्य काही दिवसांआधी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले होते. एकप्रकारे शरद पवार गटाने या जागेवरील दावा सोडावा असाच सूर राऊतांच्या बोलण्यात होता. मात्र, शरद पवार गटातील नेते असे काही करण्याच्या मूडमध्ये नाहीत. या मतदारसंघावर दावा सांगत आहेत. पक्ष आणि चिन्हाचा निर्णय विरोधात गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंंत पाटील काल (Jayant Patil) नगरमध्ये होते. लवकरच उमेदवार जाहीर करू व हा उमेदवार निश्चितपणे विजयी होणार असे त्यांनी ठणकावून सांगितले.

लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) जवळ आल्या आहेत. राजकीय पक्षांकडून हालचालींना वेग आला आहे. शरद पवार गटाचा राष्ट्रवादी विजय निश्चय मेळावा काल नगरमध्ये पार पडला. यावेळी नगर दक्षिण लोकसभेसाठी उमेदवार कोण यावर जयंत पाटलांनी मोठे भाष्य केले. लवकरच उमेदवार जाहीर करू आणि हा उमेदवार निश्चितपणे विजयी होईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

Lok Sabha 2024 : ‘राष्ट्रवादीने नगर दक्षिण सोडल्यास आम्ही तयार’ राऊतांचं दबावाचं पॉलिटक्स!

आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने आता शरद पवार गट देखील आता सक्रिय झाला आहे. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विजय निश्चय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना पाठबळ देत जयंत पाटलांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच यावेळी त्यांनी नगर दक्षिणच्या जागेवर देखील आपली भूमिका स्पष्ट केली.

महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात लवकरच बैठक होणार आहे. नगरच्या जागेसंदर्भात देखील आम्ही लवकरच उमेदवार जाहीर करू व तो उमेदवार निश्चितपणे विजयी देखील होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगर दक्षिणेच्या जागेवरून महाविकास आघाडीमधील मित्र पक्षांकडून दावा केला जात आहे. यावर बोलताना पाटील म्हणाले, की जागेवर कुणीही दावा करू शकतो तो त्यांना अधिकार आहे. जे कुणी उमेदवार या जागेवर निवडून आलेले आहे ते जरी आज पक्ष सोडून गेले असले तरी तेच राहतात त्यामुळे या बाबींची चर्चा जागावाटप करताना होणार आहे व याबाबत निर्णय घेतला जाईल असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Jayant Patil : लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र होऊ शकतात : जयंत पाटील म्हणाले, तयारीला लागा

follow us

वेब स्टोरीज