Jayant Patil : लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र होऊ शकतात : जयंत पाटील म्हणाले, तयारीला लागा
Jayant Patil : लोकसभा निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची (Lok Sabha 2024) शक्यता व्यक्त होत असल्याने राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राज्यात आणि देशात सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे राजकारणाचा अंदाज बांधणे अशक्य झाले आहेत. देशात काही निर्णय अगदीच अनपेक्षित आणि अचानक घेतले गेले त्यामुळे आगामी काळात राज्यात लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Elections) झाल्यास आश्चर्य वाटायला नको, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे राष्ट्रवादी विजय निश्चय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उपस्थितांना जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले.
Loksabha Election 2024 : प्रकाश आंबेडकरांनी मविआला दिला लोकसभेच्या ‘या’ जागांचा प्रस्ताव
देश आणि राज्य चुकीच्या दिशेने निघाले आहे. त्याला विरोध करण्यासाठी आपण एकंसघ राहिले पाहिजे. सध्याचा काळ अडचणींचा आहे. कुणाच्या तरी लहानशा अमिषाला बळी न पडता सर्वांनी ताकदीने राजकारण करावे. या देशाची आणि राज्याची अवस्था दुरुस्त करायची असेल, सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने आधी नांदत होते तसे आता नांदायचे असतील, जातीजातील तेढ कमी करायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय पर्याय नाही, असे जयंत पाटील म्हणाले.
आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या तरी त्या लढवण्याची तयारी ठेवा. विजय हा निश्चितच चांगल्या विचारांचा व आदर्श विचारांचा होतो. शरद पवार साहेबांच्या विचारांचा विजय अनेकवेळा आपण करून दाखवला आहे. शाहू-फुले-आंबेडकर यांचा विचार जपून पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करतो त्यासाठी आपण खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.
आज सत्तेत जी माणसं बसली आहेत ती आज रामाच्या पुढे उभे राहून असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की राम मंदिर (Ram Mandir) आम्हीच बांधलं. रामाला आमचा विरोध नाहीच पण या मंदिराचे श्रेय जगातल्या कोट्यावधी हिंदू बांधवांचे आहे. रामाचे मंदिर बांधले गेले याचा आम्हालाही आनंद आहे. सन 2014 सालापर्यंत देशावर 56 लाथ कोटी रुपयांचे कर्ज होते ते आता 205 लाख कोटींवर गेले आहे. याचा अर्थ आज देशातील प्रत्येक नागरिकावर दीड लाख रुपयांचे कर्ज आहे, असे जयंत पाटील म्हणाले.