Lok Sabha Elections : राज्यासह देशात लोकसभा निवडणुकांचा ( Lok Sabha elections ) धुरळा पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने जोरदार कंबर कसली. महायुतीचे जागा जवळपास निश्चित झाल्याचं समोर येतं. एकूण 48 जागांपैकी 42 जागांवर महायुतीच्य घटक पक्षांमध्ये एकमत झालं आहे. केवळ सहा जागांचा तिढा सुटायचा बाकी असल्याचं समोर आलं. त्या उर्वरित 6 जागांमध्ये अजित पवार गट भुजबळांसाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता भुजबळ देखील लोकसभेच्या रिंगणात पाहायला मिळणार आहेत.
Loksabha Election : पुन्हा भाजपच ! पण 370 जागांची ‘गॅरंटी फेल’ होणार?
महायुतीच्या या जागावाटापामध्ये सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप 25, शिंदे गट 11 आणि अजित पवार गट 6 जागांवर निवडणूक लढवणार हे निश्चित आहे. आता केवळ सहा जागांवरच चर्चा सुरू आहे. ज्या सहा जागांची चर्चा आहे, त्यामध्ये अजित पवार गटाच्या रायगडमधून सुनील तटकरे, बारामतीमधून सुनेत्रा पवार, शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील, सातारामध्ये रामराजे नाईक निंबाळकर, धाराशिवमध्ये दाजी बिराजदार, परभणीमध्ये राजेश विटेकर या सहा जागांवरील उमेदवार निश्चित असल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील शिक्षकांसाठी मोठी बातमी; विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांनाही ड्रेसकोड अनिवार्य
तर महायुतीमध्ये उर्वरित सहा जागांवर चर्चा सुरू आहे. त्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तीन जागांसाठी मागणी केली जात आहे. त्यामध्ये गडचिरोली, नाशिक आणि बुलढाणा या जागांचा समावेश आहे. गडचिरोलीमध्ये धर्मराव बाबा आत्राम, नाशिकमध्ये समीर भुजबळ किंवा छगन भुजबळ तर बुलढाण्यामध्ये डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्यासाठी अजित पवार गटाकडून या तीन जागा जागांची मागणी केली जात आहे.
त्याचबरोबर ज्या सहा जागांची चर्चा आहे, त्यापैकी काही जागा मनसेला दिल्या जाणार असल्याची माहिती आहे. यामध्ये दक्षिण मुंबईचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीला मनसेचं बळ मिळाल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला अधिक फायदा होण्याचा अंदाज आहे. तसेच या युतीचा फायदा मनसेलाही होईल, असे दिसते.