Download App

नगर दक्षिणमध्ये 5.13 तर शिर्डीत 6.83 टक्के मतदान, उमेदवारांनीही बजावला मतदानाचा हक्क

सकाळी नऊ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहिली असता नगर दक्षिणेत 5.13% तर शिर्डीमध्ये 6.83% मतदान झाले आहे.

अहमदनगर – लोकसभेच्या (Lok Sabha Elections) चौथ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे. जिल्ह्यातील अहमदनगर दक्षिण व शिर्डी लोकसभा (Shirdi Lok Sabha) मतदारसंघांमध्ये मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. सकाळी नऊ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहिली असता नगर दक्षिणेत 5.13% तर शिर्डीमध्ये 6.83% मतदान झाले आहे.

नगर दक्षिणमध्ये 5.13 तर शिर्डीत 6.83 टक्के मतदान, उमेदवारांनीही बजावला मतदानाचा हक्क 

राज्याचे लक्ष लागून असलेल्या नगर जिल्ह्यामध्ये यंदा चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे. मतदारांना जास्तीत जास्त जागृत करत मतदान केंद्रावर पोहोचवण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, नगर दक्षिणेत दहा लाख 32 हजार 946 पुरुष मतदार व नऊ लाख 48 हजार 801 महिला मतदार असे एकूण 19 लाख 81 हजार 866 मतदार आहेत.

Lok Sabha Election च्या चौथ्या टप्प्यात दिग्गजांची कसोटी; उमेदवारांसह नेत्यांनी बजावला मताधिकार 

सकाळी नऊ वाजेपर्यंत एक लाख बारा हजार पाचशे एक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण आकडेवारी पाहता 5.68% हे पार पडले आहे. दरम्यान दुपारी त्याच्या उनापूर्वीच मतदानाचा टक्का वाढला जाईल, अशी अपेक्षा देखील आता व्यक्त केले जात आहे

सकाळी ९ वाजेपर्यंतची मतांची आकडेवारी-
शिर्डी लोकसभा
अकोले – 6.50 %
संगमनेर – 10.87 %
शिर्डी- 5.85 %
कोपरगाव – 6.89 %
श्रीरामपूर – 5.17 %
नेवासा – 5.80 %

अहमदनगर लोकसभा
शेवगाव – 5.80 %
राहुरी – 4.50 %
पारनेर – 3.90 %
अहदनगर शहर – 5.72 %
श्रीगोंदा – 4.32 %
कर्जत जामखेड – 6.50 %

नेते मंडळींनी बजावला मतदानचा हक्का
शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी मतदानाचा हक्क बजावला. तर लोणी बुद्रुक येथील पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर विद्यालयात विखे पाटील परीवाराने मतदानाचा हक्क बजावला. प्रा. राम शिंदे यांनी जामखेड तालुक्यातील श्रीक्षेत्र चोंडी येथील बुथ क्रमांक 229 वर आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी आमदार प्रा राम शिंदे यांच्या आई भामाबाई शिंदे, पत्नी आशाताई शिंदे यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

जनता मला मला सकारात्मक देणार – सुजय विखे
हा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली. गेल्या वर्षी मी नवखा होतो. यावेळी जनता सकारात्मक प्रतिसाद देणार आहे, असा मला विश्वास आहे, असं सुजय विखे म्हणाले. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून ते भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.

follow us

वेब स्टोरीज