Lok Sabha Election च्या चौथ्या टप्प्यात दिग्गजांची कसोटी; उमेदवारांसह नेत्यांनी बजावला मताधिकार

लोकसभा निवडणुकीसाठी देशासह राज्यामध्ये आज चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

यामध्ये राज्यातील 11 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.

यामध्ये नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

लोणी बुद्रुक येथील पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर विद्यालयात विखे पाटील परीवाराने मतदानाचा हक्क बजावला

शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी मतदानाचा हक्क बजावला

शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मतदानाचा हक्क बजावला
