Eknath Shinde On Nilesh Lanke : महाविकास आघाडीच्या रावणरुपी असलेल्या लंकेचे दहन करून सुजय विखे (Sujay Vikhe)यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून द्या, कारण ड्रामा करुन कोणी निवडून येत नाही. त्यासाठी कामच करावे लागते, जे काम सुजय विखे यांनी केलेले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील (Ahmednagar Lok Sabha Election)महायुतीचे उमेदवार असलेल्या सुजय विखे यांना पाठबळ देत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke)यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ : राष्ट्रवादी कॉंग्रेसचा जाहीरनामा प्रसिध्द, पक्षाने कुठली आश्वासनं दिली?
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी नगर शहरातील दिल्ली गेट परिसरामध्ये विखे यांची प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रचारसभेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, आमदार राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह मोठ्या संख्येने नेतेमंडळी उपस्थित होते.
Sukh Kalale : मिथिलाला सरप्राईज करण्यासाठी माधवने घेतली मधुराज रेसिपीची मदत
यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार निशाणा साधला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या रावणरुपी लंकेचे दहन करायचे आहे. नो लंके ओन्ली विखेचा नारा देत विखेंना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचे आहे. कारण ड्रामा करून निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यासाठी कामच करावे लागते, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी प्रतिस्पर्धी असलेले निलेश लंके यांना जोरदार टोला लगावला.
राहुल गांधींनी स्वप्नात देखील पंतप्रधानपदाचा विचार करू नये :
गेली दोन टर्म लोकांनी विश्वास ठेवून पंतप्रधानपदी मोदींनाच विराजमान केले आता तिसऱ्यांदा देखील मोदींनाच पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करणार आहेत. कोणी स्वप्नात देखील विचार करू नये की, राहुल गांधी हे पंतप्रधान बनतील. मग कितीही एकत्र आले तरी इंडिया आघाडीला यश मिळवणं शक्य होणार नाही, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
जनतेचा विकास हा मोदी गॅरंटीवर आहे. इतर सगळ्यांच्या गॅरंटी फेल झाल्या आहेत. देशात फक्त एकच गॅरंटी चालली ती म्हणजे मोदींची गॅरंटी. देशाचा पंतप्रधान होण्याचा अधिकार हा केवळ मोदींनाच आहे. इतर कोणीही पंतप्रधान होऊ शकत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला.