Download App

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात ट्विस्ट! एमआयएमच्या परवेज अशरफींनी घेतली माघार

Parvez Ashrafi : नगर दक्षिणेत होणारी तिरंगी लढत आता दुरंगी होणार आहे. कारण, आता या निवडणुकीतून एमआयएमने माघार घेतली आहे.

  • Written By: Last Updated:

अहमदनगर – संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या नगर दक्षिण लोकसभा (Nagar South Lok Sabha) मतदारसंघात आता नवा ट्विस्ट आलहे. नगर दक्षिणेत होणारी तिरंगी लढत आता दुरंगी होणार आहे. कारण, आता लोकसभेच्या या निवडणुकीतून एमआयएमने माघार घेतली आहे. एमआयएमकडून परवेज अशरफी (Parvez Ashrafi) यांनी लोकसभासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

…म्हणून मला अमृता सोबत एक डान्स कोलॅब करायचं; मराठी अभिनेत्याने व्यक्त केली इच्छा 

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून येत्या 13 मे रोजी लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. नगर दक्षिणेतून महायुतीकडून सुजय विखे यांनी तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. दुरंगी असलेल्या या लढतीमध्ये एमआयएमने देखील उडी मारली होती. एमआयएमचे नगर जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांनी लोकसभा उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला होता.

Brain Activity New Research : मुले मुलींपेक्षा हुशार आहेत का? अभ्यासात समोर आली नवीन माहिती 

महाविकास आघाडीने केवळ अल्पसंख्यांक मतांचा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर केला असून राज्यात एकही अल्पसंख्याक उमेदवार दिला नाही. यामुळे अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत असल्याचे डॉ. अशरफी यांनी सांगितले होते.

उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर अशरफी यांना मुस्लिम संघटनांकडूनच मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. अशरफी यांनी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. एमआयएमच्या एन्ट्रीने महाविकास आघाडीचे मतांमध्ये विभागणी होईल, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र परवेज अशरफी यांनी माघार घेतल्याने नेमका कोणाला फायदा होणार हे येत्या काळातच स्पष्ट होईल.

दरम्यान, अशरफी हे सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. त्यांनी नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी एमआयएमतर्फे उमेदवारी अर्ज केल्यांनतर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे मात्र टेन्शन वाढले होते. मात्र आता अशरफी यांनी अर्ज माघारी घेतल्याने महाविकास आघाडीला दिलासा मिळाला आहे

follow us

वेब स्टोरीज