नगरच्या रणांगणात ‘एमआयएम’ची एन्ट्री; डॉ. परवेज अशरफींकडून उमेदवारी अर्ज दाखल

नगरच्या रणांगणात ‘एमआयएम’ची एन्ट्री; डॉ. परवेज अशरफींकडून उमेदवारी अर्ज दाखल

Ahmednagar Lok Sabha Election : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रणांगणात गुरुवारी नवा भिडू दाखल झाला आहे. एमआयएमतर्फे डॉ. परवेश अशरफी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. डॉ. अशरफी एमआयएमचे नगर जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या एन्ट्रीने आता दक्षिणेत निवडणूक अधिक अटीतटीची होणार आहे. डॉ. अशरफींच्या उमेदवारीने महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक आणखी अडचणीची झाल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

दक्षिण नगर लोकसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असताना त्यात आता एमआयएमने उडी घेतली आहे. महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आधीच महविकास आघाडीवर कुरघोडी करत प्रचारात चांगली आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीला उमेदवार सापडत नसल्याने आयता उमेदवार घेऊन निलेश लंके यांना मैदानात उतरविले.

Sujay Vikhe : जिल्ह्याबाहेरील व्यक्तीवर काय बोलायचं? सुजय विखेंचा जयंत पाटलांवर हल्लाबोल

पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. कारण डॉ. सुजय विखे यांनी तोपर्यंत संपुर्ण मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटी वाढवत आपले वातावरण तयार केले. त्यात आता एमआयएमनेही मतदारसंघात उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीने केवळ अल्पसंख्यांक मतांचा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर केला असून राज्यात एकही अल्पसंख्याक उमेदवार दिला नाही. यामुळे अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत असल्याचे डॉ. अशरफी यांनी सांगितले. त्यांना जनता आता किती साथ देणार हे तर ४ जूनला समोर येईल. पण नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात एमआयएम दाखल झाल्याने तिरंगी लढत पहायला मिळणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube