Lumpy Disease : राज्यात पुन्हा लंपीचा प्रादुर्भाव, जनावारांचे बाजार बंद करण्याचे आदेश

Lumpy disease : राज्यात लंपी आजाराने (Lumpy disease) पुन्हा डोकं वर काढले आहे. सध्या 10 जिल्हे हायरिक्स म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. आणखी काही जिल्ह्यात प्रादुर्भाव दिसतो आहे पण कमी प्रमाणात आहे. सध्या प्रामुख्याने सोलापूर, अहमदनगर सह 10 जिल्हे हायरिक्स म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. प्रादुर्भाव झालेल्या भागातील बाजार बंद करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत, […]

Lumpy Disease

Lumpy Disease

Lumpy disease : राज्यात लंपी आजाराने (Lumpy disease) पुन्हा डोकं वर काढले आहे. सध्या 10 जिल्हे हायरिक्स म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. आणखी काही जिल्ह्यात प्रादुर्भाव दिसतो आहे पण कमी प्रमाणात आहे. सध्या प्रामुख्याने सोलापूर, अहमदनगर सह 10 जिल्हे हायरिक्स म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. प्रादुर्भाव झालेल्या भागातील बाजार बंद करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी लेट्सअपला दिली.

लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने आज पशुसंवर्धन विभागात महत्वपूर्ण बैठक झाली.या संदर्भात माहिती देताना विखे पाटील म्हणाले की राज्यात पहिल्या टप्प्यात लसीकरण (Lumpy vaccination) झाले आहे. आता लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु आहे. यामध्ये वस्तस्थिती अशी आहे की मागच्या काळात गाभण असलेल्या गाई आणि वासरांना सध्या प्रादुर्भाव दिसून येतो आहे. यामध्ये आसुलेशन करणे, आंतरराज्य आणि अंतरजिल्हा बंदी घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली.

VIDEO : PM मोदींची ब्रिक्स स्टेजवरील ‘ही’ कृती अभिमानास्पद; अनेकांकडून कौतुक, नेमकं घडलं तरी काय?

ते पुढं म्हणाले की जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यातील काही जिल्ह्यांत हायरिक्स झोन तयार करण्यात येणार आहेत. हा आजार झाल्यामुळे अँटिबायोटिक्सचे प्रमाण वाढवले जाते. पण या अँटिबायोटिक्सचा दुष्परिणाम दिसून येतो आहे. आता अनेक प्रोटोकॉल तयार केले आहेत. सध्या प्रत्येक शेतकी अधिकारी फिल्डवर काम करत आहे. ज्या उपाययोजना आवश्यक आहे त्या केल्या जात आहेत. लंपी आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकारकडून कार्यवाही सुरु केली आहे, असे विखे पाटील यांनी सांगितले.

Chandrayaan 3 Landing : दिवसरात्र लक्ष ठेवणारे 1580 डोळे; वाचा 960 तासांची INSIDE STORY

पहिल्या टप्प्यात सरकारने लंपी आजारावर चांगले नियंत्रण मिळवले होते. त्याच उपाययोजना पुन्हा सुरु केल्या आहेत. बाजार बंद केल्याने मागील वेळी काही शेतकऱ्यांनी विरोध केला होता पण यामध्ये सर्व शेतकरी नव्हते. काही दलाल लोक होते, त्यांनी शेतकऱ्यांना पुढं घातले होते. बाजारात आलेल्या आजारी जनावरामुळे इतर चांगल्या जनावरांना बाधा होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. सरकारने शेतकरी आणि राज्याचे हित लक्षात घेऊन बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version