VIDEO : PM मोदींची ब्रिक्स स्टेजवरील ‘ही’ कृती अभिमानास्पद; अनेकांकडून कौतुक, नेमकं घडलं तरी काय?

VIDEO : PM मोदींची ब्रिक्स स्टेजवरील ‘ही’ कृती अभिमानास्पद; अनेकांकडून कौतुक, नेमकं घडलं तरी काय?

PM Modi Video : ब्रिक्स परिषदेत (BRICS Conference) सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स परिषदेदरम्यानचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओतील मोदींच्या कृतींमुळं त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

जोहान्सबर्गमध्ये सध्या ब्रिक्स परिषद सुरू आहे. यामध्ये भारताचाही समावेश आहे. त्यामुळं पीएम मोदी जोहान्सबर्गमध्ये आहेत. ब्रिक्स परिषदेची बैठक आटोपल्यानंतर विविध देशांच्या प्रमुखांचा ग्रुप फोटो काढतेवेळी पीएम मोदी मंचावर जात होते. मंचावर चालत जात असताना पंतप्रधान मोदींना छोट्या आकारातील भारताचा राष्ट्रध्वज म्हणजेच तिरंगा जमिनीवर पडल्याचे दिसले. तेव्हा मोदींनी थांबून, खाली वाकून तिरंगा उचलला आणि खिशात ठेवला.

स्टेजवर इतरही देशाचे ध्वज पडलेले होते. यावेळी मोदीसोबत दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा हे देखील फोटोसाठी जात असतांना त्यांनाही आपल्या राष्ट्राचा ध्वज जमीनीवर पडलेला दिसला. मोदींची कृती पाहिल्यानंतर त्यांनीही हा ध्वज आपल्या हातानं उचलला आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या हवाली केला. सुरक्षा रक्षकानेही मोदींना तिरंगा देण्याची विनंती केली. पण मोदींनी तिरंगा खिशात ठेवून दिला.

Nargis Fakhri: तलुबाज कास्टमध्ये इसाबेलच्या भूमिकेत दिसणार नर्गिस फाखरी ! 

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्यासोबत फोटो काढले.

दरम्यान, मोदींच्या या कृतीच्या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या. मोदींच्या या कृतीचं कौतुक केलं जातं आहे. नरेंद्र मोदींकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे, असंही एकानं म्हटलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube