Chandrayaan 3 Landing : दिवसरात्र लक्ष ठेवणारे 1580 डोळे; वाचा 960 तासांची INSIDE STORY
Chandrayaan 3 Landing : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 चे सॉफ्ट लँडिंग सुरक्षित पद्धतीने करण्याचा ‘इस्रो’ला पूर्ण विश्वास आहे. भारताच्या या मिशनवर संपूर्ण जगाच्या नजरा खिळल्या आहेत. ‘चांद्रयान-3’च्या सॉफ्ट लँडिंगनंतर भारत जगात रशिया, अमेरिका आणि चीनच्या बरोबरीने येणार आहे. दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश ठरणार आहे. मात्र, चंद्रापर्यंत हे यान यशस्वीपणे पोहचण्यामागे कुणा एका व्यक्तीचा हात नाहीये. आज आम्ही या मोहिमेची 960 तासांची अन् 1580 डोळ्यांची इनसाईड स्टोरी सांगणार आहोत.
खामगावची चांदी पोहचली थेट चंद्रावर! ‘बीग बी’ अमिताभ बच्चन अन् सोनिया गांधींनाही घातलीय भुरळ
इस्त्रोच्या चांद्रयान 3 यशस्वीपणे चंद्रावर पोहचवण्यासाठी 1580 डोळ्यांचे मोठे योदगान आहे. या डोळ्यांनी चांद्रयान लाँच झाल्यापासून एक सेकंदही नजर हटवलेली नाही. 14 जुलैपासून आजपर्यंत इस्रोचे 790 शास्त्रज्ञ रात्रंदिवस या मोहिमेशी जोडले गेले असून, या सर्वांनी चांद्रयान 3 चे 960 तास अक्षरक्षः डोळ्यात तेल ओतून निरीक्षण केले आहे.
भारतात मुसळधार पाऊस, चांद्रयान 3 च्या लँडिंगवेळी कसं असणार चंद्रावर हवामान?
स्पेस कमीशनचे सदस्य डॉ. किरण कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. ‘इस्रो’ ‘चांद्रयान-3’बाबत खूप आशावादी असून, यामध्ये शेकडो शास्त्रज्ञांनी रात्रंदिवस काम केले आहे. चांद्रयान 3 चे यशस्वी लाँचिंगनंतर येथे काम करणारा प्रत्येक शास्त्रज्ञ शिफ्ट संपल्यानंतरही स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी कंट्रोल सेंटरशी बोलत असे. चांद्रयान 3 चा चंद्रावर सुरक्षितपणे सॉफ्ट लँडिंग व्हावे हीच उत्कट इच्छा प्रत्येकाला होती.
Chandrayaan 3 : चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगसाठी 23 ऑगस्टचं का?
कुणी दिशेकडे तर कुणी वेगाकडे ठेवायचे नजर
चांद्रयान 3 च्या यशस्वी लाँचिंगपासून इस्त्रोची सर्व टीम डोळ्यात तेल घालून याकडे लक्ष ठेवून होती. यात काही शास्त्रज्ञ चांद्रयानाच्या दिशेकडे तर काहीजण त्याच्या वेगाकडे लक्ष ठेवून होते. तर काहीजण तांत्रिक बिघाड तपासण्याचे काम करत होते. इस्रोच्या नियंत्रण केंद्रात सुमारे दोनशे शास्त्रज्ञांचे पथक प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवून होते.
इस्त्रोचा प्लान B तयार
आज एकीकडे चांद्रयान 3 चे संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले जाणार आहे. मात्र, या दरम्यान, जर काही अडथळे आल्यास इस्त्रोकडून प्लान बी तयार ठेवण्यात आला आहे. शेवटच्या क्षणी, सॉफ्ट लँडिंगची प्रक्रिया तीन ते चार दिवसांनी वाढविली जाऊ शकते.