Download App

आम्ही मंत्रिपदाचा सट्टा लावून घेतला ‘तो’ निर्णय; मंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितले बंडखोरीचे कारण

Gulabrao Patil : शिवसेनेतून बाहेर पडण्याआधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चुकीच्या मार्गाने जात असल्याचे आम्ही त्यांना सांगितले होते. मात्र, संजय राऊतांनी (Sanjay Raut) आमची खिल्ली उडवत तुम्हाला जायचं असेल तर जा सांगितलं. मग, आम्ही विचार केला ज्या शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेना उभी केली. त्या शिवसेनेच्या मागे जायचे. एकनाथ शिंदे यांच्या मागे जाण्याचा निर्णय घेतला. अगदी मंत्रिपदाचा सट्टा लावून आम्ही तो निर्णय घेतला, असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले.

वाचा : गुलाबराव पाटील म्हणाले, ५० खोके, नागालँड ओके, अजित पवार भडकले, मुख्यमंत्रीही बोलले

जळगाव ग्रामीण मतदारसंघातील भोरखेडा येथे विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, संजय राऊतांनी आमच्यावर टीका केली. पण, सरपंचपदाचा राजीनामा देण्यासाठी सुद्धा लोक विचार करतात आम्ही तर आठ मंत्र्यांनी कोणताही विचार न करता थेट राजीनामा देऊन टाकला. कोण मंत्री देतं का राजीनामा ? आमचा आकडा फसला असता तर तेरा क्या होता गुलाबराव, आकडा आला नसता तर सट्टाच केला होता ना आम्ही.. असे ते म्हणाले.

Maharashtra Budget Session : एकनाथ खडसे अन् गुलाबराव पाटलांमध्ये सभागृहातच खडाजंगी

पण आम्ही अत्यंत  विचारपूर्वक विचार करून विचार केला. ज्या शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना उभी केली. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी जी शिवसेना उभी केली. त्या शिवसेनेच्या मागे गेले पाहिजे, एकनाथ शिंदेच्या मागे गेले पाहिजे त्यासाठी आम्ही तो निर्णय घेतल्याचे पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादी  काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांना माझ्यामुळेच जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मिळाले होते. त्यानंतर आज संजय पवार हे सुद्धा माझ्यामुळे जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.

Tags

follow us