गुलाबराव पाटील म्हणाले, ‘५० खोके, नागालँड ओके’, अजित पवार भडकले, मुख्यमंत्रीही बोलले
नागालँड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे. त्यावर शिंदे गटाचे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. गुलाबराव पाटील म्हणाले मागील काही दिवसापासून देशात बदलाचे वारे वाहत आहेत. नागालँड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजप पुरस्कृत सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नागालँड मध्ये ५० खोके विषय झाला आहे का ? असा प्रश्न विचारला. ‘५० खोके, नागालँड ओके झालंय का ?” गुलाबराव पाटील यांनी आरोप केला.
गुलाबराव पाटील यांनी नागालँड ओके झालंय का? असा प्रश्न विचारताच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) भडकले. अजित पवार म्हणाले की आज सरकार, सर्व यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहे. त्यांनी चौकशी करावी. त्याऐवजी असे आरोप करणे चुकीचे आहे. ईशान्येतील परिस्थिती वेगळी आहे. त्यानुसार निर्णय घेतले जातात. त्यावर बोलून इथे काहीच फायदा नाही. असं उत्तर अजित पवार यांनी दिल.
हेही वाचा : Live Blog | Maharashtra Budget : शिंदे फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज, देवेंद्र फडणवीस काय घोषणा करणार?
त्यावर छगन भुजबळ यांनीही गुलाबराव पाटील सभागृहात चुकीची माहिती देत आहेत. अशी टीका केली. ते म्हणले की नागालँड मध्ये आम्ही भाजपला नाही तर तेथील स्थानिक पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे “बेगाना शादी मे अब्दुला दिवाना” अशी परिस्थिती भाजपची आहे.
नागालँडचा विषय आज सभागृहात नव्हता पण तुम्ही रोज येऊन आम्हाला ५० खोके म्हणता. त्यामुळे नागालँड मध्येही असं काही झालंय का ? एवढाच प्रश्न आहे. असं एकनाथ शिंदे म्हणाले. छगन भुजबळ यांना उत्तर देताना ते म्हणाले कीं तुम्ही सरकारला पाठिंबा नाही मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला, हे सोयीचे राजकारण तुम्ही करता असं मुख्यमंत्री म्हणाले.
https://www.youtube.com/watch?v=N_-NCOncia8