Maharashtra Budget Session : एकनाथ खडसे अन् गुलाबराव पाटलांमध्ये सभागृहातच खडाजंगी

Maharashtra Budget Session : एकनाथ खडसे अन् गुलाबराव पाटलांमध्ये सभागृहातच खडाजंगी

मुंबई : राज्य शासनाच्या वैद्यकीय रुग्णालयांना लागणारी औषधं व सर्जीकल साहित्याच्या खरेदीसाठी स्वतंत्र प्राधिकरण (Independent Authority for Procurement of Medicines and Surgical Materials)तयार करण्याच्या विधेयकावर बुधवारी विधान परिषदेत चर्चा सुरु होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) जळगावच्या (Jalgaon) वैद्यकीय उपकरणे व औषध खरेदीबाबत (Purchase of medical equipment and medicine) प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यावरून जळगावचे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आक्रमक होऊन त्यांच्यात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं.

त्यावर एकनाथ खडसे म्हणाले की मी तर आपलं नाव घेतलं नाही. तुम्हाला का लागतं. यामध्ये सरकारचा हेतू शुद्ध दिसत नाही. या बिलाच्या माध्यमातून एका व्यक्तीकडं केद्रीभूत करायचं खरेदीचं आणि एका व्यक्तीच्या माध्यमातून सगळे व्यवहार करायचा हेतू दिसतो. यंत्रणा जी आहे ती अधिक ट्रान्सपरंट केली पाहिजे, त्याच्यासाठी खालची यंत्रण जी आहे त्यामध्ये काही त्रुटी वाटत असतील तर त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या माध्यमातून खरेदी झाली पाहिजे, असंही ते म्हणाले.

MIM खासदार असदुद्दीन ओवैसींचा शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले, ‘शरद ‘शादाब’ असते तर…’

अलिकडंच्या कालखंडामध्ये एफडीए (अन्न व औषध) कडं पाहिलं तर एफडीएकडं आज आहेत त्याही वस्तू कमी आहेत. त्यांनी अनेकदा मागण्या केल्या आहेत. रिसर्चसाठी, लॅबसाठी, तांत्रिक गोष्टींसाठी, त्यांना तेही माणसं मिळालेली नाहीत.

या ठिकाणी तुम्ही प्राधिकरण करणार, नियम तयार करणार, नियम तयार केल्यानंतर त्यांना कामावर लावणार त्याच्यामध्ये वेळ जाणार, त्याच्यामधल्या कालखंडामधील खरेद्या कोण करणार आहे? असाही सवाल खडसेंनी उपस्थित केला.

एकनाथ खडसे म्हणाले की, आपण स्वतः एक वेळ मेडीकल एज्यकेशनकडे मला माहित नाही कोण मंत्री होतं पण बीएएसच्या जागा वाढवण्यासाठी 50 लाख रुपये प्रतिसीटची मागणी करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे.

त्यावर सत्ताधाऱ्यांनी नावं सांगा असं म्हणाले. त्यानंतर एकनाथ खडसे म्हणाले की, नावं काय सांगू मी नोटीस दिली नाही ना. त्यावर विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे यांनी देखील नोटीस जिल्याशिवाय नको असं सांगितलं. खडसे म्हणाले की, मॅडमकडे दिले होते पैसे, नावं काय सांगू? मोठ्या अधिकाऱ्यांचं नाव सांगू का? गॅलरीमध्येच बसले आहेत, असेही एकनाथ खडसे म्हणाले.

त्यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव जिल्हा डीपीडीसीमध्ये मी पालकमंत्री आहे, हे सर्वांना माहित आहे. डीपीडीसीमध्ये भ्रष्टाचार झाला असं बोलू नये. आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत, ज्यांच्यावर आरोप झाले ते समोर बसले आहेत. ज्यांच्या घरचे लोकं जेलमध्ये आहेत, ते आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत, असं जमत नाही असा टोला यावेळी राष्ट्रवादीला मारला.

त्याचवेळी आपत्ती व्यवस्थापनला जिल्हाधिकारी अध्यक्ष असतात हे यांना माहित नाही का असा सवाल यावेळी मंत्री पाटील यांनी केला. आपत्ती व्यवस्थापनच्या वेळेस जास्त अधिकार कोणाला असतात माहिती नाही का? असंही ते म्हणाले. वरतून सरकार आदेश करायचं की, हे करा आणि खाली जिल्हाधिकारी आदेश करायचे आणि पालकमंत्री सही करायचा असं असताना डीपीडीसीमध्ये भ्रष्टाचार झाला असं म्हणतात.

अरे उघडा हे चित्र काढा ना, उघडा हे चित्र आपला जिल्हा वेशीवर टांगायचा ही बाब योग्य नाही असंही ते म्हणाले. आपणही आदरणीय व्यक्ती आहात, आपण मुख्यमंत्री पदापर्यंत जाणारी व्यक्ती आहे त्यामुळं तुम्ही हे बोलणं चुकीचं आहे, असंही जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना टोला लगावलाय.

कोण भ्रष्टाचारी आहे? कोण काय आहे? हे संपूर्ण जगाला माहित आहे. मांजर जरी डोळे झाकून दूध पित असेल तरी सगळे तिच्याकडं बघत असतात, अशा पद्धतीनं मंत्री गुलाबराव पाटलांनी एकनाथ खडसेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube