अहिल्यानगर – महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होणार असं सांगत संगमनेरच्या उमेदवारी बाबतही लवकरच घोषणा होईल, समोरचा उमेदवार कोणीही असला तरी संगमनेरात परिवर्तन होणारच आहे, असा दावा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केला. तसेच बाळासाहेब थोरातांच्या (Balasaheb Thorat) उमेदवारीवरून देखील मंत्री विखेंनी थोरातांना चिमटा काढला. संगमनेरमध्ये महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) उमेदवार तरी अद्याप कुठे फायनल आहे, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
Sonali Bendre : वेस्टर्न लूकमध्ये सोनाली बेंद्रेच्या घायाळ अदा
लाडकी बहीण योजनेबाबत मविआकडून दिशाभूल…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ‘खोडा’ घालून लाडक्या बहीणींचा घास हिरावून घेण्याचे पाप महाविकास आघाडीचे नेते करीत असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला. निवडणूक आयोगाने दोन महीने योजना बंद ठेवण्याचे आदेश दिले असले तरी, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता यापूर्वीच जमा झाला आहे. डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यातच लाडक्या बहीणींना मिळणार आहे. योजेनला मिळालेल्या प्रतिसादामुळेच महाविकास आघाडीकडून योजनेबाबत केवळ दिशाभूल करण्याचे काम सुरु असल्याची टिका त्यांनी केली.
लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांना धडकी…
शिर्डी येथे माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, महायुती सरकारने सुरु केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलीच धडकी भरली आहे. त्यामुळेच या योजनेमध्ये अडथळे आणण्याचे पाप त्यांच्याकडून सातत्याने सुरु आहे. योजना बंद पडावी म्हणून यापूर्वी आघाडीचे नेते न्यायालयात गेले. परंतू तिथेही त्यांना यश आले नाही. सत्तेत आल्यावर ही योजनाच बंद करण्याची भाषा त्यांच्याकडून सुरु झाली. आता तर निवडणूक आयोगाकडे जावून तक्रार केल्यामुळेच लाडक्या बहीणींना एक महिन्याकरीता योजनेतील रक्कमेपासून वंचित राहावे लागणार असले तरी, नोव्हेंबर महीन्याचा हप्ता महायुती सरकारने बहीणींच्या खात्यात जमा केला असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
मोठी बातमी! जागावाटपात ठाकरे गट नाराज, उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक; धाकधूक वाढली
विरोधकांना लाडक्या बहीणी दारातही घेणार नाहीत..
महायुती सरकारने जुलै २०२४ पासून सुरु केलेल्या योजनेतून पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे पैसे जमा केले आहेत. ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचा लाभ आचारसंहिता लागण्यापूर्वीच राज्यातील २ कोटी ३४ लाख पात्र बहीणींच्या खात्यात जमा झाले. योजनेबाबत दिशाभूल करण्याचे काम महाविकास आघाडीकडून सुरु असून, आघाडीच्या नेत्यांकडून योजनेमध्ये सातत्याने आणण्यात येणा-या अडथळ्यांमुळेच बहीणींना मिळणा-या आर्थिक स्वातंत्र्यापासून वंचित ठेवण्याचे पाप महाविकास आघाडीकडून केले जात आहे. याचे प्रायश्चित लाडक्या बहीणी आघाडीच्या नेत्यांना देतील आणि त्यांना दारातही उभे करणार नाहीत असा इशाराच मंत्री विखे पाटील यांनी दिला.
नाना पटोले वैफल्यग्रस्त
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघात वाढीव मतदार नोंदणी बाबत केलेल्या विधानावर भाष्य करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, निवडणूक आयोगानेच नविन मतदार नोंदणीची मुदत १९ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ठेवली होती. त्यामुळेच आयोगाच्या निर्देशाबाहेर जावून काही केलेले नाही. आघाडीमध्ये होत असलेली बिघाडी आणि योजनांच्या माध्यमातून महायुतीला मिळत असलेला जनाधार यामुळेच अशी विधानं वैफल्यग्रस्तेतून केली जात असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.