Download App

Ahmednagar Politics : भाजपाच्या मेळाव्यात खासदार सुजय विखे ‘जमिनीवरच’

Ahmednagar Politics: अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. सध्या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अन् दबदबा बराच वाढला आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. त्यासाठीत भाजपने जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. काल पक्षाचे जिल्हा प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नगरमध्ये होते. येथे त्यांनी विविध विकासकामांचे उद्घाटन केले. तसेच पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या माध्यमातून त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांत नवीन उर्जा फुंकण्याचा प्रयत्न केला खरा पण त्याचवेळी अशी एक गोष्ट घडली ज्याची चर्चा राजकीय वर्तुळात झाली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल नगरच्या दौऱ्यावर होते. फडणवीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक घेतली होती. या बैठकीत पहिल्या रांगेत फडणवीस यांच्यासह महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, आमदार राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, आ. बबनराव पाचपुते हे होते. तर दुसऱ्या रांगेत एका कोपऱ्यात खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) बसले होते. याच बैठकीत राम शिंदे यांना बसण्यासाठी खुर्ची मिळाली नव्हती. त्यावेळी खुद्द फडणवीस यांनी आपल्या शेजारी राम शिंदेंना खुर्चीसाठी जागा करून दिली होती. या प्रसंगाचीही मोठी चर्चा झाली. राम शिंदे पहिल्या रांगेत आणि खासदार सुजय विखे दुसऱ्या रांगेत. याची राजकीय चर्चा सुरू होती.

CM शिंदे 3 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर; जागा वाटप अन् मंत्रिमंडळ विस्ताराचं घोडं गंगेत न्हाणार?

या बैठकीनंतर गुलमोहोर रोड भागातील कोहिनूर मंगल कार्यालयात भाजपचा पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्याला पहिल्या रांगेत फडणवीस यांच्याबरोबर राम शिंदे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार बबनराव पाचपुते, मोनिका राजळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे हे पहिल्या रांगेत होते. त्यांच्या पाठीमागे पक्षाचे अन्य पदाधिकारी बसले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मेळाव्यात खासदार विखे व्यासपीठावर नव्हते. ते थेट समोर काही कार्यकर्त्यांबरोबर जमिनीवर बसलेले होते. आता त्यांनी असे का केले, यामागे काय हेतू असू शकतो, या माध्यमातून त्यांना काही वेगळा संदेश तर द्यायचा नाही ना अशा अनेक चर्चांनी उत आला होता.

कर्जतच्या मेळाव्यातही खुर्ची नाही 

याआधीही आ. राम शिंदे यांनी कर्जत येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यातही असाच प्रसंग घडला होता. या मेळाव्यात खासदार सुजय विखे मेळाव्यात व्यासपीठावर होते खरे पण येथेही त्यांना खुर्ची मिळाली नव्हती. त्यामुळे ते स्टेजवर ठेवलेल्या एका सोफ्याच्या कडेला टेकून बसले होते. या प्रसंगाचीही चर्चा झाली होती.

‘फडणवीस चांगला माणूस, मला त्यांची कीव येते’; राऊतांचे फडणवीसांना खोचक टोले

Tags

follow us